Lok Sabha Election Phase 1 | आज लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पार पडणार आहे. एकूण 102 मतदारसंघांमधील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील राज्याच्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच मतदारसंघांचा समावेश असून, आज याठिकाणी मतदान होणार आहे. यंदा येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे दोन भाजपचे बडे नेते रिंगणात असून, येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.(Lok Sabha Election Phase 1)
तर उत्तर प्रदेश – 8, राजस्थान – 13, मध्य प्रदेश – 6, आसाम – 5, बिहार -4, महाराष्ट्र – 5, जम्मू-काश्मीर- 1, छत्तीसगड- 1, मेघालय – 2, अरुणाचल प्रदेश – 2, त्रिपुरा -1, उत्तराखंड – 6, तामिळनाडू – 39, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, अंदमान आणि निकोबार, मिझोराम, पुडुचेरी, मणिपूर आणि लक्षद्वीपमध्ये आज मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदार संघांत सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वलेतच मतदान होईल. तर, गडचिरोलीमध्ये सकाळी 7 ते 3 या वेळेत मतदान होणार आहे. (Lok Sabha Election Phase 1)
Loksabha Election | तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार लोकसभा निवडणूक
Lok Sabha Election Phase 1 | मतदार संघ आणि उमेदवार
- नागपूर – महायुती (भाजप) – नितीन गडकरी विरुद्ध मविआ (काँग्रेस) – विकास ठाकरे
- चंद्रपूर – महायुती (भाजप) – सुधीर मुनगंटीवार विरुद्ध मविआ (काँग्रेस) – प्रतिभा धानोरकर
- रामटेक – महायुती (शिंदे गट) राजू पारवे विरुद्ध मविआ (काँग्रेस) – श्यामकुमार बर्वे
- भंडारा गोंदिया – महायुती (भाजप) – सुनील मेंढे विरुद्ध मविआ (काँग्रेस) – प्रशांत पडोळे
- गडचिरोली -चिमूर – महायुती (भाजप) – अशोक नेते विरुद्ध मविआ (काँग्रेस) – नामदेव किरसान (Lok Sabha Election Phase 1)
Lok Sabha Election | आमदारकीचे तिकीट हवे असेल तर लीड द्या; भाजपची नवी ऑफर..?
मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा भाजपला फटका बसणार..?
आज सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येक मतदान केंद्रावर मॉक पोल केलं जाणार आहे. या मॉक पोलद्वारे ईव्हीएम अचूक पद्धतीने काम करत आहे की नाही याची चाचपणी केली जात आहे. नागपूरमध्ये 27 उमेदवार आहेत. आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्वच पक्ष, उमेदवार आणि प्रशासन सज्ज झाले आहेत.
चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती. मात्र, येथे भाषणादरम्यान, मुनगंटीवार यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजी पसरली आहे. त्यामुळे याचा भाजपला फटका बसणार का..? मतदार त्यांची नाराजी मतपेटीतून दाखवणार का..? हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. (Lok Sabha Election Phase 1)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम