Skip to content

अति मद्य व कीटक नाशक सेवन केल्याने लोहोणेर येथील मजुराचा मृत्यू


देवळा : अति मद्य व कीटक नाशक सेवन केल्याने लोहोणेर ता देवळा येथे कामाला असलेल्या मजुराचे गुरुवारी (१३) रोजी निधन झाले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोहोणेर ता देवळा येथील शेतकरी गोरख नामदेव बागुल यांच्याकडे कामाला असलेला मजूर दिलीप सुखदेव गायकवाड (६५) रा आघार ता मालेगाव याने गुरुवारी (१३) रोजी अती मद्य व किटन नाशक सेवन केल्याने त्याला उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी गायकवाड याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मालेगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र उपचारादरम्यान त्याचे सामान्य रुग्णालयात निधन झाले . अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे यांनी दिली . या घटनेबाबत मालेगांव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!