Skip to content

लोहणेर येथील एसटी कर्मचाऱ्याच्या अकस्मात मृत्यूने हळहळ


देवळा : लोहोणेर ता.देवळा येथील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या अकस्मात मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर ता.देवळा येथील रहिवासी व एसटी महामंडळाचे वाहक किशोर नितीनचंद्र परदेशी (३९) यांचे दि २७ रोजी आकस्मिक निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे .या घटनेची देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करीत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!