Election: देवळा बाजार समिती निवडणुक; 56 उमेदवारी अर्ज विक्री, तीन उमेदवारी अर्ज दाखल

0
31
देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी व्यापारी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना अमोल आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

Election : देवळा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज दि २८ रोजी १३ उमेदवारी अर्ज विक्री झाले असून, आतापर्यंत एकूण 56 अर्ज विक्री झाली असून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी दि २७ पासून उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्यास सुरुवात झाली असून,पहिल्या दिवशी ३० अर्ज विक्री झाले होते. आज दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांनी दिली . (Election)

Deola MSCB: देवळा उपविभागात नऊ गावांची घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची वीजबिल थकबाकी शून्य

देवळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी व्यापारी गटातून उमेदवारी अर्ज दाखल करतांना अमोल आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

यात सोसायटी गटातून विलास धोंडू अहिरे (गुंजाळ नगर) , व्यापारी गटातून अमोल महारू आहेर , देवळा , हमाल व तोलारी गटातून भावराव बाबूंराव नवले (सटवाई वाडी ) यांचा समावेश आहे. दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीमुळे गावागावांत इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्याची लगभग पहावयास मिळत आहे.
यानिमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला असून , निवडणूक बिनविरोध होणार कि ,चुरशीची लढत रंगणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here