लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर वारी


निफाड प्रतिनिधी : लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या वतीने लासलगाव ते पंढरपूर सायकल राईड ही सायंकाळी पाच वाजता दत्त मंदिर येथून झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

लासलगाव येथील वीस सायकलिंग असोसिएशनचे सदस्य हे लासलगाव ते पंढरपूर 355 किलोमीटर अंतर पार करणार आहेत. या सायकल रॅलीतून राइड फॉर हेल्थ व प्राईड फॉर नेशन्स असा संदेश दिला जाणार आहे.
या मध्ये पहिला टप्पा लासलगाव ते येवला त्यानंतर येवला ते अहमदनगर अहमदनगर ते टेंभुर्णी टेंभुर्णी ते पंढरपूर असा 355 किलोमीटरचा प्रवास या माध्यमातून केला जाणार आहे.

यावेळी राणा स्टील च्या वतीने दत्त मंदिर लासलगाव सायकलिंग असोसिएशनच्या हस्ते घड्याळ सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी लासलगाव स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने सायकलिंग असोशियन सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉक्टर अनिल बोराडे व सुनील उगलमुगले यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

या सायकल रॅली मध्ये लासलगाव सायकलींग असोसिएशन चे अध्यक्ष अनिल ब्रम्हेचा, ज्येष्ठ सदस्य संजय पाटील, डाॅ. किरण निकम, डॉक्टर अनिल ठाकरे, इंजिनियर संजय कदम, सुनिल ठोंबरे , तुषार लोणारी ,विजय वैद्य, डॉक्टर उत्तम रायते , रियाज शेख ,सागर खांबेकर, व्यंकटेश वाबळे ,अमोल गंगेले,अरुण थोरे,विजय कुंदे श्रेयांश कांकरीया, शरद भामरे, गणेश औटी, महेश वर्मा, सिद्धार्थ डागा हे सहभागी झाले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!