Nashik | नाशकात दुधाचा मोठा साठा केला जप्त; गायीच्या दुधातदेखील भेसळ सुरु

0
1

Nashik News | गायीचे दूध हे शुद्ध व पौष्टिक असते. गायीचे दूध म्हणजे संपूर्ण कुटुंबीयांसाठी विशेषतः लहान मुलांसाठी पोषक ठरते. पण आता गायीच्या दूधातही आता भेसळ करण्यात आल्याचे समोर आलेले आहे. नाशिकच्या निफाडमध्ये बनावट दूध विकले जात असल्याचे समोर आलेले आहे. एका तेल सदृश्य पदार्थांपासून बनवले जात आहेत. नाशिक मधील बागायतदार परिसर असलेल्या निफाडमध्ये 97 प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये 420 लिटर गायीच्या दुधासह साडे पंधरा हजारांचा मिसळ युक्तसाठा जप्त केला आहे. (Nashik)

Big News | एका मिनटात स्मशानभूमीत झाला शुकशुकाट; लोक मृतदेह सोडून पळाले

निफाड तालुक्यातील बोकडदरे शिवारात कातकडे मळा येथे भेसळ दुध तयार होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळताच या पथकाने धाड टाकत एका दुधाच्या प्लास्टिक कॅनमध्ये भेसळयुक्त दूध आढळून आलेले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यामध्ये डेअरी परमीट पावडर १८ किलो, व्होल मिल्क पावडर ३४ किलो, तेलसदृश पदार्थ १७० लिटर आणि वरील पदार्थांची भेसळ करून बनविलेले ४२० ली. गायीच्या दुधाचा साठा विक्रीसाठी तयार करण्यात आलेला होता. या सगळ्या साठ्यातून अन्न सुरक्षा आणि  मानके कायद्यांतर्गत डेअरी परमीट पावडर १६ किलो किंमत २२४० रूपये, व्होल मिल्क पावडर ३२ किलो किंमत ७६८० रूपये, तेलसदृश पदार्थ १६८ लिटर किंमत २५७०४ रूपये आणि भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर किंमत रूपये १२,५४०/- असा एकूण ४८,१६४ रूपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. बनावट गायीचे दुध हे भेसळयुक्त आणि नाशवंत असल्याने कोणीही सेवन करु नये त्यामुळे आरोग्य मानवी सेवनास येऊ नये या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आलेले आहे.

Nashik | देवळातील नवीन शेतकरी वंचित राहण्याची शक्यता!

दुध पावडरचे पुरवठादार हेमंत पवार, शहा,पंचाळे, ता. सिन्नर आणि तेल सदृश पदार्थ सिन्नर माळेगांव येथील मोहन आरोटे यांच्यावर अन्न सुरक्षा मानके कायद्याचे २६(१),२६(२)(I) शिक्षा पात्र कलम ५९ व भादवि २७२,२७३ व ३२८ अंतर्गत पुढील तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here