Big News | एका मिनटात स्मशानभूमीत झाला शुकशुकाट; लोक मृतदेह सोडून पळाले

0
1

Big News | भारतीय संस्कृतीनुसार आपल्या जवळच्या वा ओळखीच्या व्यक्तीचं निधन झालं तर सर्वजण त्याला अखेरचा निरोप द्यायला जात असतात. त्या कुटुंबीयाच्या दु:खात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन करणे हा त्यामागील हेतू असतो. शेवटचा अग्नी देईपर्यंत नातेवाईक मित्र मंडळी स्मशानभुमीत थांबलेले असतात. मात्र एका गावात एक अजबच प्रकार घडला. भंडाऱ्यातील एका गावात अंत्ययात्रेसाठी आलेले लोक मृतदेह सोडूनच पळाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. (Big News)

Nashik | देवळातील नवीन शेतकरी वंचित राहण्याची शक्यता!

नक्की काय घडलं असं त्या गावात?

लोक वाट दिसेल तिकडे धावत सुटले

मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी हल्ला सुरू केल्याने तेथील सर्वचजण घाबरले. यामुळे मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वच लोक तिथून पळायला लागले. जो तो जीव मुठीत घेऊन पळु लागला होता. दिसेल तिकडे लोक सैरावैरा धावु लागले होते.  जीव वाचवण्यासाठी लोक फक्त धावतच होते. अवघ्या एका मिनिटात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला होता. या धावपळीत अनेकजण पडलेदेखील हाते. या सगळ्यात अनेका लोकांना मुक्का मार लागला. मधमाशांच्या या हल्ल्यात 15 जण गंभीर जखमी झालेत. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलेले आहेत.

Nashik | आमदार खोसकर आले अडचणीत; नाशकात चर्चाना उधाण.. नेमकं काय घडलं?

धुरामुळे मधमाशांनी केला हल्ला

या दरम्यान या स्मशानभूमीच्या बाजूला असंख्य झाडे आहेत. या झाडांवर मधमाशांची पोळंदेखील आहेत. तिथे मृतदेहाला अग्नी देताच जाळ आणि धूर निर्माण झालेला होता. धुराचे लोट सर्व परिसरात पसरले होते. यामुळे मधमाशाही पोळावरून उठल्या आणि त्यांनी स्मशानभूमीतील नागरिकांवर हल्ला केला अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here