Lalit Patil Case| पुण्याच्या ससून रुग्णालयातून ललित पाटील ड्रग्स प्रकरण पुढे आले होते. गेल्या महिन्याभरापासून याप्रकरणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. ललित पाटीलच्या भावाच्या नाशिकमधील कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. आता त्याच्या ड्रायवरने नाशिकच्या देवळा तालुक्यातील गिरणा नदीत फेकलेले ड्रग्स पोलिस शोधत आहेत.
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील पाच दिवसांपासून ड्रग्ससाठा शोधण्यासाठी साकीनाका पोलिस टीमने नाशिकमध्ये सर्च ऑपरेशन राबवत आहे. नाशिक जिल्ह्यातील लोहनेर ठेंगोडा येथील गिरणा नदीत फेकलेला कोट्यावधी रुपयांचा ड्रग्स साठा शोधण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या टीमने ४ तास स्कुबा ड्रायव्हरच्या सहाय्याने अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले होते. आणि आता तोच ड्रग्स साठा पुन्हा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम आता नाशिकमध्ये आली आहे.
Gold Silver Rate| ऐन दिवाळीच्या तोंडावर, सोन्याचे दर पुन्हा चढले वर…
पुन्हा प्रयत्न सुरु…
ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघने गिरणा नदीत फेकलेले ड्रग्स शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक पुन्हा रविवारी देवळा तालुक्यात आले आहे. ठेंगोडा येथील गिरणा नदी पात्रात फेकलेले ड्रग्स शोधून काढले जात आहेत. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा ड्रायव्हरच्या मदतीने पुन्हा ड्रग्सचा शोध घेतला जात आहे. १५ फूट खोल असलेल्या गिरणा नदीपात्रात हे सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. तसेच ह्या ड्रग्सच्या शोधासाठी नदीवरील साठवण बंधाऱ्यातील पाणी सोडले आहे. ललित पाटीलची पोलीस कोठडी येत्या सोमवारी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी माहिती जमा करण्यासाठी पोलिसांकडून तपासाची गती वाढवण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा ललित पाटीलची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारे यांचा आरोप
ललित पाटीलचे एनकाउंटर केले जाईल किंवा त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू होईल, असा थेट दावा पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हा दावा केला होता. त्यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पोलीस कस्टडीमध्ये असणाऱ्या कुठल्याही आरोपीला धोका नसतो. २४/७ आरोपी पोलिसांच्या नजरेखाली आहेत. सुषमा अंधारे यांच्याकडे काही ठोस माहिती असेल. तर, त्यांनी ती राज्याच्या महासंचालकांकडे द्यावी, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Maratha reservation| नाशिक जिल्ह्यातील पाचशे गावांत पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम