Gold Silver Rate| ऑक्टोबर महिन्यात सोने आणि चांदीने चांगलाच मोठा पल्ला गाठला आहे. महिन्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या दरांत घसरणी सुरु होती. काही जागतिक घडामोडींमुळे सगळीच गणितं बिघडली आहे. मात्र, आता दिवाळीला ग्राहकांना तेजीच्या दरानेच हे धातू खरेदी करावे लागू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका पण मध्य-पूर्वेत थेट उतरल्याने युद्धाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अनेक देशांच्या केंद्रीय बँका ह्या सोन्याचा साठा करीत आहे. सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे दारांतही मोठी वाढ होऊ शकते. नोव्हेंबर महिन्यात तर सोने – चांदी ह्या वर्षाचे सर्व रेकॉर्ड मोडू शकतात. सोने हे ६३,००० रुपयांचा पल्ला गाठू शकते. तर चांदीविषयी साशंकता आहे.
तेजी कायम…
गुडरिटर्न्सनुसार, ह्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. २३ ऑक्टोबरला किंमती ३०० रुपयांनी खाली आल्या होत्या. तर, २४ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर २४० रुपयांनी वाढले होते. २५ ऑक्टोबरला ११० रुपये तर २६ऑक्टोबर रोजी १६० रुपयांची वाढ होती. आता २८ ऑक्टोबर रोजी दरांत थेट ६०० रुपयांची वाढ झाली आहे. आता २२ कॅरेट सोन्याचे दर ५७,५५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचे दर ६२,७७० रुपये प्रति १० ग्रॅम इतके झाले आहे.
Maratha reservation| नाशिक जिल्ह्यातील पाचशे गावांत पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’
चांदीची पडझड
23 ऑक्टोबरला सोने २०० रुपयांनी खाली उतरले. तर, २४ ऑक्टोबरला चांदी ५०० रुपयांनी खाली आली. तर, २६ ऑक्टोबर रोजी चांदीने ५०० रुपयांनी महागली. २७ ऑक्टोबर रोजी चांदीत ५०० रुपयांनी पुन्हा खाली आली. आता एक किलो चांदीचा भाव ७४,६०० रुपये आहे.
१४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार , २४ कॅरेट सोने ६०,९८४ रुपयांहून ६०,८८५ रुपयांवर घसरले आहे. दरम्यान, २३ कॅरेट ६०,७४० रुपयांवरुन ६०,५८१ रुपयांवर आले आहे . २२ कॅरेट सोने ५५,६८१ रुपयांवरून ५५,७१६ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.१८ कॅरेट ४५,६१९ रुपये, तर १४ कॅरेट सोने ३५,५८३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे.
Ajit Pawar| अजित दादांना मराठ्यांचा फटका; बारामतीचा दौरा रद्द…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम