Lakshman Hake: राज्यात सध्या मराठा ओबीसी वादड चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुन्हा 20 जुलैपासून उपोषणाचे हत्यार उपसले असून, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही राज्यभरात ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा सुरू केली आहे.
दरम्यान, या यात्रेदरम्यान आज लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टिका केली असून, राज्य सरकारने लाडकी बहीण, लाडक्या भावासारखी मनोज जरांगेंसाठी ‘लाडका आंदोलक’ नावाची एखादी योजना जाहीर करावी, अशी खोचक टिका हाके यांनी मनोज जरांगे आणि राज्य सरकारवर केली आहे. तर, विरोधकांनीही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी देण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या ओबीसी आंदोलकांनी आजपासून ‘ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा’ सुरू केली आहे. शासनाच्या संरक्षणाखाली खिरापत वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेटचे वाटप केले जात असल्याचे आरोपही हाके यांनी सरकारवर केले आहे.
eknath shinde and sharad pawar | शरद पवार-मुख्यमंत्र्यांची तासभर बैठक; बैठकीत काय चर्चा..?
Lakshman Hake | सरकार जरांगेंचे लाड करतंय
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनीही मनोज जरांगे यांच्यावर टीका केली असून, जरांगे नावाच्या या बांडगुळाने राज्यात हैदोस घालण्याचे आणि हॉटेल व ओबीसी नेत्यांच्या गाड्या जाळण्याचे काम केले असल्याचे आरोप वाघमारे यांनी केले आहेत. जरांगेंच्या अनेक आंदोलनांदरम्यान प्रशासन व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम केल्याचे असून, हे सरकार केवळ जरांगेंचे लाड करत असल्याचे वाघमारे म्हणाले. (Lakshman Hake)
शरद पवारही जरांगेंची भाषा बोलताय
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे. हे आता सर्व महाराष्ट्राला माहित असून, जरांगेंच्या पाठीशी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याचा दावा नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्यात तीव्र होत असताना हा वाद शरद पवारांनी (Sharad Pawar) सोडवायला हवा. तर, शरद पवारही मनोज जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार मूग गिळून गप्प का बसलेत.
Manoj Jarange | खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या भेटीला, सोबत भुजबळांचे कट्टर विरोधक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम