Ladke Daji Yojana | लाडक्या बहिणींना तगडे आव्हान; लाडक्या दाजींसाठी आली खास योजना

0
96
Ladke Daji Yojana
Ladke Daji Yojana

Ladke Daji Yojana | राज्यात सध्या केवळ लाडकी बहीण योजनेचीच (Ladki Bahin Yojana) चर्चा आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर अनेकांनी लाडक्या भावांना काय..? असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठीही योजनेची घोषणा केली. लाडका भाऊ आणि बहिणीनंतर आता लाडक्या दाजींसाठीही नवी योजना पुण्यात सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात लाडकी सून योजना सुरू झाली होती. यानंतर आता लाडक्या दाजींसाठी योजना सुरू झाली आहे. पुण्यातील ‘राया बिर्याणी’ या हॉटेल मालकाने ‘पुण्याचे लाडके दाजी’ ही मजेशीर योजना (Ladke Daji Yojana) सुरू केली आहे. दरम्यान, या योजने अंतर्गत लाडक्या दाजींना आपल्या बिलावर दर महिन्याला 1500/- चे अनुदान दिले जाणार आहे. मात्र, यासाठी लाडक्या दाजींना लाडक्या बहिणीला आठवड्यातून एकदा ‘राया बिर्याणी’ या हॉटेलमध्ये जेवायला गेऊं जावं लागणार आहे. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडक्या दाजींना काही नियम व अटीही घालण्यात आल्या आहेत.

Ladki Bahin Yojana | मविआची लाडक्या बहिणींना मोठी ऑफर; राऊतांनी बहिणींना दिला ‘शब्द’

Ladke Daji Yojana | अशा आहेत नियम व अटी 

  1. लाडक्या दाजीला बिलावर दर महिन्याला 1500/- रुपयांची (सूट) अनुदान दिले जाणार आहे.
  2. लाडक्या दाजींना लाडक्या बहिणीला आठवड्यातून एकदा जेवायला आणावे लागेल.
  3. लाडके दाजी आपल्या मैत्रिणीसोबत आल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
  4.  दाजी बाहेर ‘पार्टी’ करून येऊ शकतात. इतर लाड आपल्याकडे केले जाणार नाही.
  5. युती, आघाडी, वंचित, मनसे अशा सर्व पक्षीय दाजींनाही या योजनेचा लाभ घेता येईल. (Ladke Daji Yojana)
  6. ही ऑफर केवळ राया बिर्याणी, सदाशिव पेठ, पुणे येथेच सुरू असून इतर हॉटेलमध्ये जाऊन अनुदानासाठी भांडू नये.

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट; लाखो महिलांना होणार फायदा..!


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here