Kumbhmela | कुंभमेळासंदर्भात पालकमंत्र्यांची ‘चाय पे चर्चा’

0
1

Kumbhmela | दर बारा वर्षांनी नाशिक त्रंबकेश्वर येथे भरणारा सिंहस्थ कुंभमेळा खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासाठी पर्वणी ठरत असतो. सन 2027-28 या कालावधीत कुंभमेळा होत असून या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि शहरालगतच्या परिसरात कुठला विकास होणे गरजेचे आहे.

कुंभमेळा म्हणजे ठरावीक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदु भाविकांचा मेळा असतो.दर बारा वर्षांत नाशिक(त्र्यंबकेश्वर) या तीर्थक्षेत्री कुंभमेळा भरत असतो. कुंभमेळा आणि त्याचे धार्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्वं हे जगभरात मान्यता पावलेले आहे. त्यामुळे कुंभमेळा पहायला केवळ भाविकच येतात असं नसुन जगभरातून देशी आणि विदेशातील पर्यटक देखील या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी येतात. कुंभमेळा हे आर्थिक उलाढालीचे महत्त्वाचे केंद्रही मानले जाते.

IND vs PAK सामन्याला जात असाल तर सावधान; मोदी स्टेडिअम उडवून देण्याची धमकी

नाशिक शहरात होण्याऱ्या कुंभमेळा मुळे नाशिक शहरात वेगवेगळ्या पर्यटकांची हजेरी नाशिक शहरात असते.त्यामुळे नाशिकमधील काही महत्वाची कामे होणे गरजेचे आहे. नाशिक शहराच्या कुठल्या समस्यांवर मार्ग काढणे गरजेचे आहे.

त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे –
– साधू ग्रामच्या जागेचे नियोजन करणे,आरक्षण टाकणे आणि अधिक ग्रहण करणे.
– प्रदूषण मुक्त गोदावरी मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरण करणे.
– नाशिक शहरातील जुने रिंगरोडची रुंदी वाढवणे, अस्तरीकरण व शक्य तिथे कॉंक्रिटीकरणाचा समावेश करणे,तसेच रिंग रोड साठी भूसंपादनाला विशेष प्राधान्य देणे आणि त्यासाठी खर्चाची तरतूद करणे.
– गत सिंहस्थ कुंभमेळ्यात तर नाशिक शहरात 72 किलोमीटरचे रस्ते उभारण्यात आले होते. यंदा ते ३०० किलोमीटर पर्यंत तरी न्यावे असे नियोजन करणे. त्यात पंधरा मीटरच्या रस्त्यांचे 30 मीटर पर्यंत रुंदीकरण करणे आवश्यक आहे.
-यातील अनेक रस्ते हे न्यायप्रविष्ट असून त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. रिंग रोड साठी भूसंपादन करावे.
– सिंहस्थ कुंभमेळ्याचा साधा उल्लेख देखील अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे पायाभूत सुविधांची उभारणी ही एनसीहस्त काळाच्या तोंडावर करता येणार नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात त्यासाठीच्या भरीव निधीची तरतूद करावी.
– नाशिक मधील साधूग्रामच्या जागेसाठी 375 एकर जागा भूसंपादन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे मात्र याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तब्बल सव्वाचार कोटींचा हा प्रस्ताव आहे.
– नाशिक महानगरपालिका हद्दीत अडीचशे एकर जागेवर साधुग्राम आरक्षण आहे. 2003-4 पासून महापालिकेने ह्या जागा आरक्षित करून ठेवले आहेत. तेथील शेतकऱ्यांना त्यात काहीही करता येत नाही. 2014-15 च्या कुंभमेळ्याच्या वेळी तात्पुरत्या भाडेतत्त्वावर त्या जागा भाड्याने घेऊन सादूग्राम करून वेळ भागवली. तेव्हा शेतकऱ्यांनी न्यायालयात गेले आठ महिने विलंब झाला. शेवटी तडजोडीने शेतकऱ्यांना जागा दिली. साधू ग्राम झाल्याने तिथे रस्ते सिमेंट दगड वाळू मुरूम टाकल्याने त्या जमिनी नापीक झाल्या आणि तेथे शेती करणे शक्य नाही. आता त्या जागा कायमस्वरूपी ताब्यात घ्याव्याच लागतील परंतु त्यांना इतके पैसे कोण देणार हा प्रश्न आहे.  त्यामुळे यासंदर्भात योग्य तो निर्णय शासन स्तरावर होणे गरजेचे आहे.
– साधूग्रामच्या जागेवर अनेक खाजगी मंगल कार्यालय लॉन्स आहेत. ही मंगल कार्यालय फक्त कुंभमेळ्यासाठी त्या कालावधीत सरकारने हे लॉन्स आणि मंगल कार्यालय अधिकृत करून घ्यावे.

Meesho Sale Today: मोबाईल चार्जर, फोनचे साहित्य आणि केबल 250 रुपयांपेक्षा कमी किमतीत, Meesho वर 73% पर्यंत सूट

सोमवार दि. ९ ऑक्टोबर २०२३ संध्याकाळी ४.३० वा. वैराज कलादालन, नासिक, येथे मा. श्री. दादासाहेब भुसे, पालक मंत्री, नाशिक, महाराष्ट्र शासन यांचे बरोबर ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात नाशिक सिंहस्थ कुंभ मेळा अंतर्गत होणाऱ्या विकास कामांवर ज्यात महत्त्वाने रिंग रोड, गोदा घाट, तपोवन विकास, पायाभूत विकास इ. बाबतीत आपले विचार, म्हणणे, सूचना मांडावयाच्या असतील तर नागरिकांना विनंती आहे की, आपले विचार, सूचना, मनोगत खालील मो. नं. वर लेखी स्वरूपात मांडाव्यात किंवा पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मो. नं. 9422247360

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here