Kisan Sabha Protest | नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा पाचवा दिवस; अनेकांना साथीचे आजार

0
31
Kisan Sabha Protest
Kisan Sabha Protest

Kisan Sabha Protest | मागील पाच दिवसांपासून नशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या वतीने आणि माजी आमदार जिवा गावीत यांच्या नेतृत्वाखाली ‘महामुक्काम आंदोलन’ सुरू आहे. आज आय आंदोलनाचा पाचवा दिवस असून, दुसऱ्या दिवशीच या आंदोलनातील एका आंदोलकाचा मृत्यू झाला होता. मात्र, अजूनही आंदोलक हे त्यांच्या मागण्यांवर आणि आंदोलनावर ठाम आहेत.

यातच आता वातावरण बदलामुळे यापैकी अनेक आंदोलकांना आजाराची लागण होत आहे. ताप, अंगदुखी, खोकल्याचा अनेकांना त्रास होता असूनही हे आंदोलक मात्र माघार घेत नसून, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. (Kisan Sabha Protest)

Nashik | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा

एकीकडे तापमानाचा पारा हा वाढत आहे. काल ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, आंदोलक मात्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून आहेत. दरम्यान, या आंदोलनात नशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गांगुडबारी या गावातील ८८ वर्षीय शेतकरी देवराम दळवी हे देखील सामील झाले असून, तेदेखील आजारी आहेत. त्यांना ताप, खोकला आणि अशक्तपणा असून, ते आजारी आहेत. (Kisan Sabha Protest)

Kisan Sabha Protest | सरकार फक्त आश्वासन देत आहे…

देवराम दळवी हे ‘लॉन्ग मार्च’ मध्ये देखील सहभागी होते. दरम्यान, कोणी काही खायला दिलं तर ते खातात व औषधे घेऊन रस्त्यावरच सतरंजी टाकून ईतर आंदोलकांसोबत झोपतात. मागे या शेतकऱ्यांचा लॉंग मार्च हा मुंबईत देखील दाखल झाला होता. तर, राज्य सरकार हे केवळ आश्वासने देत असून, यावेळी आम्ही आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धार दळवी यांनी केला आहे. (Kisan Sabha Protest)

Nashik Breaking | नाशिकमध्ये सुरू असलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलकाचा मृत्यू

आज यावर तोडगा निघणार..?

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेचा हा मोर्चा माजी आमदार जीवा गावीत यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. आज या आंदोलनाचा पाचवा दिवस असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नसल्याचा इशारा उपस्थित आंदोलकांनी सरकारला दिला आहे. आतापर्यंत शासनासोबत आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या तब्बल तीन बैठका झाल्या असून, या तिन्ही बैठकांमधील चर्चा हि फिस्कटली आहे.

आज सायंकाळी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक पार पडणार असून, या बैठकीकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. या आंदोलनामुळे शहरातील मुख्य रस्ता पाच दिवसांपासून बंद असल्याने नाशिककरांना यामुळे त्रास सहन कारावा लागत आहे. (Kisan Sabha Protest)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here