देवळा : खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे . या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ,खालप ता देवळा येथील सरपंच मनीषा वसंत सूर्यवंशी हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असून, या गैर कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात नऊ सदस्यांनी काल सोमवारी दि १० रोजी तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. यात ग्रामपंचायत सदस्य विमलबाई सूर्यवंशी , विजया देवरे, बेबीबाई सूर्यवंशी, कांताबाई पिंपळसे, हिरामण पवार ,संतोष भामरे, मुरलीधर आहिरे ,सुनील सूर्यवंशी, बाजीराव सूर्यवंशी या नऊ सदस्यांचा समावेश आहे. खालप ग्रामपंचायतीच्या एकूण ११ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर आपल्या सह्या केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षात सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले आहे, कुठल्याही प्रकारचा मनमानी कारभार केला नाही . चांगले काम विरोधकांच्या डोळ्यात खुपसते .
– मनीषा वसंत सूर्यवंशी
सरपंच, खालप ग्रामपंचायत
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम