Skip to content

मेतकर पतसंस्थेला २४ लाखांचा नफा ; चेअरमन अजय मेतकर


देवळा : देवळा येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेस या आर्थिक वर्षात २४लाख ०८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अजय मेतकर यांनी दिली.

खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

मार्च अखेर संस्थेकडे ५ कोटी १८ लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून ,कर्ज वाटप ४ कोटी ३६ लाख रुपये संस्थेने वित्तीय संस्थांमध्ये १ कोटी ८४ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणुक केलेली असून, संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी १४ लाख रुपये आहे. संस्थेकडे विविध प्रकारचा १ कोटी १७ लाखांचा निधी जमा झालेला असून ,वर्षअखेर संस्थेचे खेळते भागभांडवल ७ कोटी ८१ लाख रुपये आहे. कर्ज वसुलीचे प्रमाण ९७.४०% असून थकबाकी ४.६० टक्के आहे. संस्थेचा सी.डी. रेशो ६२.४६टक्के आहे. संस्थेने स्थापनेपासूनच सभासदांना दरवर्षी लाभांश व भेटवस्तूंचे वाटप केलेले आहे.

संस्थेच्या वतीने गरजु सभासदांना वेळोवेळी तात्काळ कर्जपुरवठा केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर यांनी दिली . या प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन विष्णू जाधव, राजेश मेतकर, संतोष शिंदे, संदिप बागुल, आनंदा सोनवणे, विठठल कोठावदे, संजय शिवदे, गौरव मेतकर, वैशाली शेवाळकर व्यवस्थापक- के. एम. देवरे, सचिव-संदिप देवरे, भूषण शिरसाठ, ज्ञानेश्वर मेतकर, संदिप भामरे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!