काय सांगता ? चक्का घोड्याचा झाला दशक्रिया विधी अन् जमले राज्यभरातून नागरिक

0
2
कवडदरा : येथे राज्या घोड्याच्या दशक्रिया विधी प्रसंगी उपस्थित बैलगाडा टांगा शर्यत प्रेमी.(छाया : राम शिंदे)

राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील शेतकरी किसन रोंगटे यांचा सुप्रसिद्ध राजा नावाचा घोडा गेल्या चार पाच वर्षात राज्यभरात बैलगाडा टांगा शर्यतीत नावारूपाला आला. दिवसेंदिवस होणाऱ्या टांगा शर्यतीत जिंकत राजा घोड्याने रोंगटे परिवारासह कवडदरा ,इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचे राज्यभरात नाव कोरले.

कवडदरा : येथे राज्या घोड्याच्या दशक्रिया विधी प्रसंगी उपस्थित बैलगाडा टांगा शर्यत प्रेमी.(छाया : राम शिंदे).

शेतकऱ्यांसाठी टांगा प्रेमींसाठी अत्यंत आवडता असलेला राजा घोडा दिनांक २४ ऑक्टोम्बर २०२२ रोजी सिन्नर येथील पाटीवर शर्यत जिंकून आला. कवडदरा गावात गाडीतून उतरविल्यानंतर घोटी-सिन्नर महार्गावर रस्ता ओलांडत असतांना एका कंटेनरची राजा घोड्याला जोरात धडक बसली आणि हाच क्षण रोंगटे परिवार आणि कवडदरा गावातील टांगा प्रेमींसाठी काळाचा घात ठरला.या दुर्दैवी अपघातात राजा घोडा याला मोठी दुखापत झाली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा अखेर अंत झाला. आणि रोंगटे परिवाराने ऐन दिवाळीत दुःखाचा हंबरडा फोडला.

कवडदर येथील रोंगटे परिवारातील शेतकरी किसन भाऊराव रोंगटे, पोलीस पाटील प्रकाश रोंगटे, सुभाष रोंगटे, कैलास रोंगटे, भाचे सामाजिक कार्यकर्ते भूषण डामसे, संदीप रोंगटे, यांनी पोटच्या मुलाप्रमाणे लहानपणापासून या त्यांच्या आवडत्या लोकप्रिय राज्या घोड्याचे संगोपन केले होते.एक वेळ घरातील मुलांकडे दुर्लक्ष झाले असेल परंतु या राज्या घोड्याच्या खुराकात त्यांनी कधीच कसूर केली नाही.महिन्यात लाखोंचा खर्च याची देखील परवा त्यांनी केली नाही याचाच अर्थ प्राणी मात्रावर रोंगटे परिवाराचे असलेले प्रेम,जिव्हाळा आपुलकी ही त्यांच्या रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त होती हे यातून दिसून येते.

दरम्यान २४ ऑक्टोम्बर रोजी झालेल्या दुर्दैवी अपघातात लहान मुलांबाळासह टांगा प्रेमींसाठी आवडता असलेल्या राज्या घोड्याचा अंत झाला आणि आपल्या घरासमोर राज्या घोड्याचा अंत्यविधी करण्यात आला. हीच शोककळा कवडदरा येथील रोंगटे परिवाराने हळहळ व्यक्त करत दिनांक ०२ ऑक्टोम्बर २०२२ रोजी राज्या घोड्याचा दशक्रिया कार्यक्रमातून व्यक्त करत शेतकरी बांधवांना एक आगळा वेगळा संदेश दिला. शेतकरी म्हंटला की पाळीव प्राणी त्यात गाय म्हैस, बैल, कुत्रा, मांजर यांसह घोडा आदींचा त्यात प्रामुख्याने समावेश असतोच याच प्राणी मात्रावर माणसाने प्रेम करत त्यांचे संगोपन कसे केले पाहिजे हे यातून दिसुन येते. दरम्यान या राज्या घोड्याच्या दशक्रिया विधीला राज्यभरातुन विविध ठिकाणाहून घोडा बैल बैलगाडा टांगा शर्यत प्रेमी मोठ्या संख्येने आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी ह भ प मनोहर महाराज घोडे यांनी प्रवचनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ते आजपर्यंत मानवी जीवनात घोड्याचे असलेले महत्व विशद केले.

त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, कला क्रीडा क्षेत्रातील शोकाकुल टांगा प्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तदनंतर पसायदान झाले व त्यानंतर सर्वांना जेवणाचा कार्यक्रमातून साद घातली. दरम्यान शोक व्यक्त करतांना शेतकरी मालक संदीप रोंगटे,किसन भाऊराव रोंगटे, पोलीस पाटील प्रकाश किसन रोंगटे यांनी कुटुंबातील लहानग्यांसह हंबरडा फोडला आणि तोच उपस्थितांचे डोळे पाणावले सर्वांच्या डोळ्यातून एकच फक्त प्राणी मात्रांवर असलेले प्रेम जिव्हाळा याचे अश्रू टिपकत होते.

अश्या या कालवश झालेल्या स्व राज्या घोड्याचा कवडरा येथील रोंगटे कुटुंबीयांनी मोठ्या दिमाखात मंडप, साऊंड, गोड धोंड जेवण ,कीर्तन प्रवचनातून दशक्रिया विधी संपन्न केला. दरम्यान सर्वांनी प्राणी मात्रांवर प्रेम करावे आणि त्यांची जोपासना कशी करावी तर याचे उत्तम उदाहरण कवडदरा येथील रोंगटे परिवाराकडून शिकायला मिळाले अश्याच पध्दतीने प्राणी मात्रांवर सर्वांनी प्रेम केले पाहिजे आणि त्यांचे संगोपन जोपासना केली पाहिजे असा आशावाद इगतपुरी तालुका पंचायत समिती माजी सभापती सोमनाथ जोशी, विठ्ठल लंगडे, भूषण डामसे, रतन बांबळे, आदींसह अन्य टांगा प्रेमींनी यावेळी व्यक्त केली.हा आगळा वेगळा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेचा विषय झाला असून राज्यभरात फक्त नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत यानंतर नाव असेल तर कवडदरा येथील राज्या या घोड्याची. आणि त्याच्या दशक्रिया विधीची..

असा हा आगळा वेगळा अंत्यविधी अखेर पार पडला. शोकाकुल मध्ये किसन भाऊराव रोंगटे, प्रकाश रोंगटे, सुभाष रोंगटे, कैलास रोंगटे, संदीप रोंगटे, सागर,रामचंद्र, लक्ष्मण, ऋषिकेश आदी रोंगटे परिवार तर वैभव धनु डामसे, सर्किट धनु डामसे, ओमकार रोंगटे,भूषण डामसे, आदींसह राज्या ग्रुप कवडदरा, गोंदे दुमाला,घोटी खुर्द, महाराष्ट्र राज्य बैलगाडा, चालक मालक संघटना इगतपुरी नाशिक व राज्यभरातील टांगा प्रेमींनी पसायदानातून यावेळी शोक व्यक्त करत राज्या घोड्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here