Jyoti Waghmare | भूसेंच्या सभेत वाघमारेंनी विरोधकांना घेरलं; ‘जिरे मिरे अद्वय हिरे’ म्हणत तूफान टोलेबाजी

0
59
#image_title

Jyoti Waghmare | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्ये आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री दादा भुसे यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधी उमेदवार असणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांचा समाचार घेतला. दोन दिवसांपूर्वी अद्वय हिरे यांनी दादा भुसेंवर टीका केली होती. यावेळी त्यांनी दादा भुसे यांच्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरूनच आता ज्योती वाघमारे यांनी अद्वय हिरेंवरती निशाणा साधला असून सभेत अद्वय हिऱ्यांची ऑडिओ क्लिप ऐकवत सडकून टीका केली.

Dada Bhuse | मालेगावच्या सभेत दादा भुसे कडाडले; ‘येडं पायडू’ म्हणत हिरेंना ललकारले

काय म्हणाल्या ज्योती वाघमारे? 

“मी आज काही लोकांचा पद्धतशीर समाचार घेण्याकरिता मालेगावात आली आहे. जिरे मिरे सॉरी अद्वय हिरे… मला त्या जिरे मिरेंना सांगायचे आहे. अरे आडनावात जरी हिरे असले, तरी जिल्हा बँकेत तू काय दिवे लावलेत हे मला माहिती आहे. इथे जमलेल्या ह्या लाडक्या बहिणी अशा जिऱ्या मिर्यांना रोज फोडणीला घालतात. त्यामुळे तडका कसा लावायचा आणि भडका कसा उडवायचा हे लाडक्या बहिणीला कोणी शिकवू नये. इथून पुढे जर कोणी आमच्या नेत्यांच्या विरोधात अदवा तदवा बोलले तर याद राखा गाठ लाडक्या बहीणींशी आहे.” असे म्हणत अद्वय हिरेंवर निशाणा साधला.

हे बंड हिंदुत्व टिकवण्यासाठी केले

पुढे बोलत “या ऐऱ्या गैर्यांना मला विचारायचं आहे. आम्ही काय चोरलं ते तू आम्हाला नको सांगूस ही क्रांती होती, हा उठाव होता. ‘बगावत करने के लिए कलेजा चाहिये तलवे चाटणे वालो के लिए सीर्फ जीभ काफी होती है |’ हे बंड हिंदुत्व टिकवण्यासाठी केले, संविधान टिकवण्यासाठी केले व आपल्या लाडक्या बहिणींना लाभ मिळावा म्हणून केले. त्यामुळे चोरण्याचा आरोप करणाऱ्यांना मला विचारायचे आहे की, जीपीसी बँकेचे पैसे चोरले त्याचा हिशोब आधी तुम्ही द्या.”

Dada Bhuse | ‘बापाची औलाद असशील तर दाखव पेनड्राईव्ह’; भूसेंचे विरोधकांना खुले आव्हान

“जीभघसऱ्याला तमाम शिवभक्तांनी आगामी निवडणुकीत लायकी दाखवा”

तसेच “संभाजी महाराजांचं नाव एकेरी घेणाऱ्याला या जीभघसऱ्याला तमाम शिवभक्तांनी आगामी निवडणुकीत त्याची लायकी दाखवून द्यावी. दादा भुसे यांच्या वडिलांचे नावही त्यांनी एकेरी घेतले. दगडू भुसे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाठ्या काठ्या सोसल्या. त्यामुळे त्यांचे नाव एकेरी उच्चारत तमाम स्वातंत्र्यसैनिकांचा त्यांनी अपमान केलेला आहे. इथल्या शाळांसाठी महाविद्यालयांसाठी शेतकरी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्या परंतु नाव मात्र यांनी आपल्या बापजाद्यांची लावली” असं म्हणत त्यांनी हिरे कुटुंबीयांवरही निशाणा साधला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here