Jitendra Awhad | राज्यात भाजप कार्यकर्ते आक्रमक; महाराष्ट्रातील वातावरण पेटलं!

0
16
Jitendra Awhad
Jitendra Awhad

Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. यातच नुकतंच आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार गट तसेच भाजप यावरुन चांगलाच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. घाटकोपर पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तर पुण्यात भाजपने आव्हाड यांच्या विरोधात तिरडी आंदोलन सुरु केलं आहे. आता महाराष्ट्रातील वातावरण प्रभू श्री रामांच्या आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Sushma Andhare | मालेगावात ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या!

अजित पवार गटाचे कार्यकर्ते ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर गेले आणि त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर रामाची आरती म्हणत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंअसून यावेळी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे परिसरात काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं.

“इथे आताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापाने आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून आता वनवासाला पाठवायला निघाले आहेत. मात्र, आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणून यांचा प्लॅन सक्सेस होऊ शकणार नाही. आम्ही यांचा प्लॅन हानून पाडू तेसच आधी इतिहास समजून घ्या, श्रीराम आईवडिलांना मानायचे आणि तुमचे नेते आईवडिलांचा अपमान करून त्यांना घराच्या बाहेर घालवत आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.

शिवसेना वैद्यकीय कक्षा तर्फे मोफत 2D इको तपासणी शिबिर; लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

Jitendra Awhad | नेमकं जितेंद्र आव्हाड म्हणाले काय? 

हिंदू धर्माच्या देवी-देवतांबद्दल बोलून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी शिर्डीतही पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करम्यात आला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर वादग्रस्त वक्तव्य केलं. ते बाेलताना म्हणाले की,  राम हा शाकाहारी नव्हता तर तो मांसाहारी होता. एवढी वर्ष जंगलात राहून कोणी शाकाहारी राहतं का? असं वक्तव्य शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here