Skip to content

Sushma Andhare | मालेगावात ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या!

Sushma Andhare

Sushma Andhare | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ह्या वेगवेगळ्या कारणांवरून कायम चर्चेत असतात. त्यांच्या अनेक वक्तव्य आणि त्यांनी केलेल्या आरोपांमुळे अनेक मंत्र्याच्या टीकास्त्राच्या त्या शिकारही होत असतात. यातच एक मोठी बातमी आता समोर येत असून सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?

Sushma Andhare | नेमकं प्रकरण काय ?

सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुक्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे सुषमा अंधारे यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. अमन परदेशी यांनी केलेल्या तक्रारीवरून मालेगाव तालिका पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत असतातच आणि यातच काही दिवसांपूर्वी अंधारे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला एक रोखठोक मुलाखत दिली होती.

या रोखठोक मुलाखतीत सुषमा अंधारे यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या संबंधी जाणून-बुजून हिन दर्जाचा शब्दप्रयोग करत हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप मालेगाव तालुक्यातील अमन परदेशी यांनी केला आहे. यासंदर्भात अमन परदेशी यांनी मालेगाव पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

शिवसेना वैद्यकीय कक्षा तर्फे मोफत 2D इको तपासणी शिबिर; लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

दरम्यान, मालेगाव तालुक्यातील अमन परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भा. द. वि. कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकीकडे मालेगावमधील शिवसेना उपनेते अद्वय हिरे जेलमध्ये असताना संजय राऊत यांच्यापाठोपाठच सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने मालेगावमध्ये ठाकरे गटाच्या अडचणी वाढताना दिसत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!