Jansanman Yatra | देवळ्यातील जनसन्मान यात्रेतून राष्ट्रवादीच्या नव्या कारकीर्दीचा ‘उदय’

0
101
Jansanman Yatra
Jansanman Yatra

Jansanman Yatra |  मागील चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा ही नाशिक जिल्ह्यात असून, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेतेमंडळी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा दौरा करत आहेत. दरम्यान, काल ही यात्रा देवळा शहरात आली होती. या यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मंत्री अनिल पाटील हे यावेळी उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला देवळ्यातील जनेतेचाही अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला.

देवळ्यातील जनतेचा उदयकुमार आहेरांवर प्रेम आणि विश्वास कायम 

जनसंवाद यात्रेत देवळ्याचा सहभाग नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते देवळ्याचे भूमिपुत्र उदयकुमार आहेर यांनी तो योग जुळवून आणला आणि या यात्रेला देवळा वासीयांनीही तितकाच प्रतिसाद दिला. देवळा नगर पंचायतीच्या निवडणुकीतील पराभवानंतर देवळ्याच्या स्थानिक राजकारणातून उदयकुमार आहेर बाहेर पडले आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले.

अजित दादांची साथ देत उदयकुमार आहेरांनी राज्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मागील काळात ते स्थानिक राजकारणात सक्रिय नसले तरी अजूनही देवळ्यातील जनतेचे त्यांच्यावरील प्रेम आणि विश्वास हा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. (Jansanman Yatra)

Jansanman Yatra | राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा देवळ्यात; नेतेमंडळींची देवळा वासीयांना साद

Jansanman Yatra |  प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणारे नेतृत्व

उदयकुमार आहेर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी देवळा तालुक्यातील प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचे आणि सामान्यांसाठी लढण्याचे काम केले. त्यांचे संघटन कौशल्य, राजकीय कसब यामुळे देवळा तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातही त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणारे देवळ्यातील कणखर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

प्रस्थापितांना धडकी भरवणारी गर्दी जमणे हे विशेषच..!

चांदवड देवळा मतदारसंघात मागील दोन टर्मपासून भाजपची सत्ता असून, प्रस्थापितांमुळे तालुक्यात भाजपची वाहवाह आहे. तर, तालुक्यात राष्ट्रवादी तशी नावालाच असताना आणि उदय आहेर यांच्याकडे कुठलीही सत्ता, पद नसताना इतकी अभूतपूर्व आणि प्रस्थापितांना धडकी भरवणारी गर्दी जमणे हे विशेषच..! दरम्यान, देवळा तालुक्याला अजूनही विकास कामांची अपेक्षा असून, कालची सभा आणि लोकांचा प्रतिसाद हा एकूणच देवळा तालुक्यातील भविष्याच्या चांगल्या घडामोडींची नांदी असल्याचे यामुळे दिसून आले.(Jansanman Yatra)

NCP | उदयकुमार आहेरांवर राष्ट्रवादीच्या ‘प्रवक्ते’ पदाची जबाबदारी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here