Jansanman Yatra | १५ दिवसात आमचा नवा खासदार होणार; मालेगावातील बडा नेता गळाला लावण्याचा प्रयत्न

0
76
Jansanman Yatra
Jansanman Yatra

मालेगाव :  अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा ही सध्या नाशिकमध्ये असून, आज मालेगावमध्ये अजित पवारांची सभा झाली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 दिवसांत आमचा नवीन खासदार असून, यानंतर आम्ही अल्पसंख्याक समाजांचे विषय केंद्रात मांडू आणि वक्फ बोर्डाबाबतही कोणतीही अडचण येऊ देणार नाही आणि आमचा पाठिंबा हा नेहमी अल्पसंख्याक समाजाला असेल असे आश्वासन अजित पवारांनी दिले आहे.

अजित पवार, भाजपचा प्रत्येकी १ खासदार राज्यसभेवर जाणार 

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) व खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे या लोकससभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले असून, त्यांच्या राज्यसभेतील रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha Election) होणार असून, या दोन जागांपैकी एक जागा ही भाजपला(BJP) आणि एक जागा अजित पवार (NCP Ajit Pawar Group) गटाला देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे आज माळेगवंत बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) येत्या 15 दिवसांत आमचा नवीन खासदार होणार असल्याचे जाहीर करत वक्फ बोर्डाच्या निर्णयाबाबतही (Waqf Board) स्पष्टीकरण दिले आहे.

Jansanman Yatra | राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा देवळ्यात; नेतेमंडळींची देवळा वासीयांना साद

Jansanman Yatra | दादांचा अल्पसंख्याकांना मोठा वादा  

संसदेच्या अधिवेशनात अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वक्फ बोर्ड कायद्यात संशोधन विधेयक सभागृहात मांडले. याविरोधात आतापासूनच विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. एनडीएतील घटक पक्ष जेडीयू आणि टीडीपीने या विधेयकाच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. मात्र सरकारचे हे पाऊल अल्पसंख्यांक समाजात अशांतता निर्माण करेल, असे मत काही मुस्लिम संघटनांनी व्यक्त केले आहे. यावरून देशातील राजकारण तापलेले असताना आज मालेगावात अजित पवारांनी अल्पसंख्याकांना मोठे आश्वासन दिले आहे.

आमच्या मागे उभे रहा, आमचाही अल्पसंख्याकांना पाठिंबा 

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “तुम्हीही आमच्या मागे उभे रहा. कारण येत्या 15 दिवसात आमचा नवीन खासदार होणार असून, आम्ही अल्पसंख्याक समाजांचे प्रश्न केंद्रात घेऊन जाऊ. आम्ही वक्फ बोर्डाच्या विषयातही कोणतीही अडचण येऊ देणार नाही. आम्ही अल्पसंख्याक समाजावर आणि कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. आमचा पाठिंबा हा कायम अल्पसंख्याक समाजाला असेल, असा वाडा यावेळी अजितदादांनी अल्पसंख्यांक समाजाला दिला आहे.

Jansanman Yatra | ‘पक्ष म्हणत होता खासदार व्हा, पण मला फक्त मराठीच येतं’; झिरवाळांचं मिश्किल भाषण अन् घोषणा

नाशिकमधील शरद पवारांचा दूसरा नेता गळाला लवण्याचा प्रयत्न 

दरम्यान, जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने मालेगावात असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी आमदार आसिफ शेख यांची सदिच्छा भेट घेतली. तर, माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनानंतर ही केवळ एक सांत्वनपर भेट असल्याचे स्पष्टीकरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, आसिफ शेख यांना आपल्या पक्षाकडून ऑफर देण्यासाठी ही भेत असल्याचे बोलले जात आहे. तर, यावर आसिफ शेख म्हणाले की, “काँग्रेससह अनेक पक्षांनी मला पक्षात येण्यासाठी ऑफर दिल्या असून, मी मालेगाव मध्य मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here