Jalgaon | राऊत म्हणे भाXXX; गुलाबराव पाटील म्हणाले तुम्ही महाभाXXX नाही का..?

0
26
Jalgaon
Jalgaon

Jalgaon |  नेहमीच आपल्या वादग्रस्त वकतव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) जळगाव येथील सभेत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करताना पुन्हा एकदा जीभ घसरली. यावेळी त्यांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टिका करताना त्यांना भाXXX असा शब्द वापरल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच “बाळासाहेबांनी एका पान टपरीवाल्याला आमदार आणि मंत्री केले होते. पण आता या पान टपरीवाल्याला घरी बसवण्याची वेळ आल्याचेही राऊत जळगावच्या सभेत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले असून, “संजय राऊत म्हणजे एक वाया गेलेली केस आहे. त्यांना लवकरात लवकर ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याची जळजळीत टीका गुलाबराव पाटलांनी राऊतांवर केली.

संजय राऊत ही एक वाया गेलेली केस असून, त्याला लवकरात लवकर ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायला पाहिजे. आता तुम्ही आम्हाला भाXXX असं म्हणताय. मग आधी तुम्ही आमच्याचसोबत युती केली होती. त्यामुळे तुम्ही महाभाXXX नाहीये का? पण आम्ही कधीही या प्रकारची भाषा वापरत नाही वापरणार नाही. कारण आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. पण आता त्यांनी अंगावर घेतलंच आहे. तर आम्हीही उद्याच्या सभेत त्यांना शिंगावर घेलयाशिवाय राहणार नाही, असा इशाराच मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिला आहे.

Jalgaon | १ खासदार ठाकरे गटात अन् ४०० कार्यकर्ते शिंदे गटात 

Jalgaon | खानदेशात काय पिकते हे दाखवून देऊ

खासदार संजय राऊत हे बोलण्यात कितीही पटाईत असले. तरीही त्यांची आजची भाषा ही काही संस्कृतीला धरून नव्हती. त्यांनी अजून आमच्या खानदेशच्या गोष्टी पहिल्या नाही. त्यामुळे त्यांना माहित नाही. ज्यावेळी प्रचाराची वेळ येईल ना तेव्हा त्यांना आमच्या खानदेशात काय काय पिकते हे आम्ही दाखवून देऊ. त्यांच्या भाषेपेक्षा आमची भाषा ही अत्यंत खालच्या दर्जाची आहे. पण आम्ही ती वापरत नाही. पण आता तुम्ही स्वतःहून अंगावर आलाच आहात तर, तुम्हाला शिंगावर घेणार, असा इशाराही गुलाबराव पाटलांनी दिला.

Jalgaon | उन्मेष पाटलांमुळे स्मिता वाघ यांचे जाहीर झालेले तिकीट कापणार..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here