मोठी बातमी | पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नाशिककरांवरील पाणीपट्टी वाढीचं संकट टळलं!

0
12

नाशिक | नाशिककरांवर पाणीपट्टी वाढीच संकट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने टळलं आहे. नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी वाढीला पालकमंत्र्यांनी अखेर ब्रेक लावलेला आहे. त्यामुळे या निर्णयाच नाशिककरांकडून स्वागत करण्यात येत आहे.(मोठी बातमी)

देवळा तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांना फटका; पंचनाम्याची मागणी

काय होतं प्रकरण?

१९९२ मध्ये नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक होऊन लोकप्रतिनिधींची सत्ता स्थापन झाली. १५ मार्च २०२२ ला पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन सत्ता स्थापन होणे गरजेचे होते, मात्र ओबीसी आणि मराठा आरक्षण तसेच राज्य सरकारच्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागू झाली होती. २०२२ आणि २३ या आर्थिक वर्षामध्ये प्रशासनाकडून २२७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले होते. स्थायी समितीने ३३९ कोटी ९७ लाख रुपयांचे नवीन कामे सुचवत २, ५६७ कोटी रुपयांपर्यंत अंदाजपत्रक फुगविले. परंतु, निवडणुका न झाल्याने प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचीच अंमलबजावणी झाली. मागील आर्थिक वर्षाचा डिसेंबर महिन्यात जमा-खर्चाचा आढावा घेण्यात आला होता. त्यात साडेचारशे कोटी रुपयांची उत्पन्नात तूट दर्शविण्यात आली. त्यामुळे उत्पन्नवाढीच्या विविध उपाययोजना अमलात आणल्या जात होता.

Deola | माळवाडीत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त उद्या होणार रक्तदान शिबीर

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीच्या योजना अमलात आणताना विविध शुल्क, तसेच पाणीपट्टीत वाढ होईल अशी माहिती समोर आली होती. महसूल वृद्धी करण्याचे प्रयत्नसध्या अनधिकृत मालमत्ता शोधमोहीम हाती घेण्यात होती. त्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याबरोबरच आगामी अंदाजपत्रकामध्ये बेकायदा बांधकामे, जाहिरात फलकावरील दंड वाढवून महसूल वृद्धी करण्याचे प्रयत्न आहे. त्याचबरोबर नगररचना अग्निशमन, तसेच उद्यान विभागाच्या परवानगी शुल्कामध्येदेखील वाढ होईल, अशी माहिती समोर आली होती. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणीपट्टीच्या दरात भरमसाट वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता नशिकरांवरील पाणीपट्टी वाढीचे संकट टळले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने पाणीपट्टी वाढीला ब्रेक लागला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here