Skip to content

Deola | माळवाडीत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त उद्या होणार रक्तदान शिबीर


सोमनाथ जगताप-प्रतिनिधी : Deola |  देवळा तालुक्यातील माळवाडी – फुले माळवाडी येथील महात्मा ज्योतिबा फुले क्रीडा मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार (दि. 28) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बागुल, उपाध्यक्ष लक्ष्मण बच्छाव यांनी दिली आहे.

देवळा तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादकांना फटका; पंचनाम्याची मागणी
मंगळवार (दि. 28) भव्य रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, संत सावता माळी पतसंस्थेतील पदाधिकाऱ्यांचा सन्मान, माळवाडी, फुले माळवाडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सन्मान मंडळामार्फत करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिराचे उद्घाटन मविप्रचे संचालक विजय पगार यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त डॉ. निलेश जेजुरकर मानसोपचार तज्ञ सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे ,चेस्ट फिजिशियन डॉ.योगेश चित्ते तसेच रक्त संकलनासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

Chhagan Bhujbal | शिंदे समिती बरखास्त करा, कुणबी दाखलेही रद्द करा; भुजबळांची मागणी

दरम्यान, महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त मंडळाच्या वतिने सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिर होत आहे. अशी माहिती मंडळाचे सचिव जयराम सोनवणे, सदस्य दावल भदाणे, हेमंत बागुल, रिंकू जाधव, तात्या भाऊ भदाणे यांनी दिलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!