Infotech news | Disney+Hotstar फ्री सब्सक्रिप्शनसह आला हा नवा प्लॅन

0
2

Infotech news |  देशातील दुसरी सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी म्हणजेच भारती एयरटेलने ८६९ रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन बाजारात लॉंच केलेला आहे. हा नवीन प्लॅन असा आहे की, ह्या कंपनीने ८३९ रुपयांच्या प्लॅनचे बेनिफिट्स ह्या नवीन ८६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये देण्यास सुरुवात केलेली आहे, हे सांगता येईल किंवा ह्या कंपनीनं ८३९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ही वाढवली आहे. असं देखील आता म्हणता येईल. चला तर, जाणून घेऊयात Airtel Rs. 869 च्या ह्या Plan ची संपूर्ण माहिती.Infotech

एयरटेल 869 rs.प्लॅन

वर सांगितल्याप्रमाणे एयरटेल कंपनीनं आपल्या ह्या ८३९ रुपयांचा प्लॅन मध्ये बदल करत आता नवीन प्लॅन सादर केला आहे. ह्या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. तसेच युजर्सना ८४ दिवसांपर्यंत डेली २ जीबी डेटादेखल मिळणार आहे. म्हणजे एकूण तुम्ही १६८ जीबी डेटा वापरू शकणार आहात.

त्याबरोबरच युजर्स ८४ दिवस डेली कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा देखील लाभ घेऊ शकणार आहेत. तसेच, यात आता रोज तुम्हाला १०० एसएमएस देखील मिळणार आहेत. एयरटेलच्या ह्या नवीन प्लॅनचे अतिरिक्त बेनेफिट्स पाहता ह्यात युजर्सना अनलमिडेट ५ जी डेटाचा अ‍ॅक्सेसही मिळत आहे.Infotech

Agriculture News | यंदा कडधान्य आयातीमध्ये दुपटीहून अधिक वाढ

जर, तुम्हाला ओटीटी स्ट्रीमिंगची आवड असेल तर, तुम्हाला ह्या प्लॅनमध्ये ३ महिन्यांसाठी एयरटेल Disney + Hotstar चे मोबाइल सब्सक्रिप्शनदेखील देत आहे. त्याबरोबरच ह्यात Apollo 24|7 Circle, फ्री हॅलो ट्यून तसेच विंक म्यूजिकचे देखील फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

नेटफ्लिक्स सब्सस्क्रिप्शन 

एयरटेलने अलीकडेच नेटफ्लिक्सच्या (बेसिक) सब्सक्रिप्शनसोबत एक नवीन ओटीटी प्लॅन सादर केला होता. ह्या प्लॅनची किंमत १४९९ रुपये अशी आहे. विशेष म्हणजे एयरटेल कंपनीचा हा पहिला प्लॅन आहे. ज्यात मोफत नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. हा प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो आहे.

त्याचबरोबर युजर्सना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज १०० एसएमएस, डेली ३ जीबी अनलिमिटेड ५ जी डाटादेखील मिळतो आहे. इतकेच नाहीतर, ह्यात एयरटेल थँक्सचे बेनिफिट्स, जसे की अपोलो 24|7 सर्कल, फ्री हेलोट्यून्स तसेच विंक म्यूजिकचा देखील ह्या पॅक मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.Infotech

Infotech news | iPhoneच्या लुक व फीचर्ससह आला हा अँड्रॉइड स्मार्टफोन


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here