Info-Tech News | कार खरेदी करताय? 2024 मध्ये लॉन्च होताय या जबरदस्त कार

0
53

Info-Tech News | भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता अनेक कार कंपन्या त्यांच्या नवीन कार सादर करणार आहेत. 2024 हे नवीन वर्ष ऑटो क्षेत्रासाठी विषेश ठरणार आहे.

2024 मध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या 5 सब-कॉम्पॅक्ट SUV कार लॉन्च करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन SUV कारचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामध्ये काही कार सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्धही आहेत.

चांदवड | पोलिसांची मोठी कारवाई; 50 लाखाचा गुटखा जप्त

Kia Sonnet

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. Sonet SUV कार २०२० मध्ये भारतात लॉन्च करण्यात आलेली होती. नवीन कारमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवीन हेडलाइट लेआउट आणि पुन्हा डिझाइन केलेले डेटाइम रनिंग लाइट्स आणि फॉग लॅम्प मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mahindra XUV300 Facelift

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या XUV300 फेसलिफ्ट कारची चाचणी सुरु केलेली आहे. ही कार अनेकदा चाचणी दम्यान दिसून आलेली आहे. कारमध्ये अनेक बदल केल्याचे पहायला मिळालेले आहे. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत बदल करण्यात आलेले आहेत.

ब्रेकिंग | नाशकात वातावरण तापलं! भुजबळांचा ताफा जाताच गावकऱ्यांनी गोमुत्र शिंपडलं

Tata Punch EV

टाटा मोटर्सने Punch एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. सध्या Punch कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आलेला आहे. आता लवकरच पंच कारमध्ये EV पर्याय देखील पहायला मिळू शकतो. Gen 2 Sigma आर्किटेक्चरवर ही कार तयार केली जाणार आहे. सिंगल चार्जमध्ये 300 किमी रेंज देण्यास सक्षम असलेला बॅटरी पॅक कारमध्ये दिला जाईल.

Toyota Taisor

उत्पादक कंपनीकडून देखील 2024 मध्ये त्यांची नवीन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार Taisor सादर केली जाणार आहे. ही कार मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित असणार आहेत. Fronx कारसारखेच फीचर्स या कारमध्ये देखील पाहायला मिळू शकतात.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here