Info-Tech News | SIM कार्डसाठी आधार-पॅनची गरज नाही; १ जानेवारीपासून नियम बदलणार

0
27

Info-Tech News | Department of Telecom (DOT)ने एक स्वागतार्ह निर्णय घेत घोषणा केलेली आहे. मोबाइल युजर एनरोलमेंटसाठी आता पेपर बेस्ड KYC ची गरज नाही तसेच हा बदल १ जानेवरी २०२४ पासून अंमलात आणला जाणार आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांची प्रोसेस सुधारेल, खर्च कमी होईल तसेच सिम फ्रॉड कमी होऊ शकतात. (Info-Tech News)

Big News | आता दर शनिवार आणि रविवार बँकांना सुट्टी? अर्थ मंत्रालयाची माहिती

सध्या जी प्रोसेस आहे ज्यात अनेक कागदी फॉर्म भरावे लागतात तसेच फोटो द्यावा लागतो आणि ओळखीचा, पत्त्याच्या पुराव्याच्या कॉपी द्याव्या लागतात. ह्या प्रोसेसची जागा पूर्णपणे डिजिटल केव्हायसी घेणार आहे. त्यामुळे आता सिमकार्ड घेण्यासाठी सिमकडं आधारकार्ड किंवा पॅनकार्ड इत्यादी पुरावे सोबत नेण्याची गरज नाही तुम्ही डिजिलॉकर सारख्या अ‍ॅप्सचा देखील वापर करू शकणार आहात.

सध्याच्या केव्हायसी फ्रेमवर्कमध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे आता ९ ऑगस्ट २०१२ च्या सूचनेनुसार सुरु असलेली पेपर बेस्ड केव्हायसी प्रोसेस १ जानेवारी २०२४ पासून बंद केली जाणार आहे. हे डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशननं मंगळवारच्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलेलं आहे. इंडस्ट्रीमधील एक्सपर्ट्सच्या मते ह्या बदलामुळे टेलिकॉम कंपन्यांचा ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी होईल तसेच फसवणुकीच्या घटनादेखील कमी करण्यासाठी सरकारला देखील मदत होऊ शकते.

ह्यापुर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये टेलिकॉम डिपार्टमेंटनं एक घोषणा केली होती की, ज्यात सिम कार्ड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी नियम कडक करण्यात आलेले होते. त्यामुळे सिम कार्ड विक्रेत्यांकडून होणाऱ्या फ्रॉडला आळा बसेल, असा उद्देश आहे आणि हे नवीन नियम १ डिसेंबरपासून लागू झालेले आहेत.

Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

Airtel, Reliance Jio आणि Vodafone-Idea साठी खुशखबर

केव्हायसीच्या नव्या नियमांमुळे टेलिकॉम कंपन्यांना मोठा फायदा होणार असून पेपर बेस्ड केव्हायसी रद्द झाल्यामुळे डिजिटल केव्हायसी युजर एनरोलमेंटचा खर्च कमी करेल. तसेच सरकारला सिम कार्ड फ्रॉडवर लक्ष ठेवण्यास देखील मदत होऊ शकते. सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी अनेकदा आपल्या ग्राहकांना सिम कार्ड संबंधित स्कॅम्सची सूचना दिलेली आहे. (Info-Tech News)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here