Big News | आता दर शनिवार-रविवार बँकांना सुट्टी? अर्थ मंत्रालयाची माहिती

0
3
Big News
Big News

Big News | बँकेसंदर्भात रोज नवनवीन अपडेट्स येत असतात आणि आता अशातच केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंगळवारी (दि. ०५) संसदेत बँकेसंदर्भात एक महत्त्वाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. यामध्ये भारतातल्या सर्व बँकांमध्ये दर शनिवारी सुट्टी घोषित करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली आहे. आता प्रत्येक आठवड्याला फक्त ५ दिवसच काम करण्याचा प्रस्ताव बँकांनी मांडला असून हा प्रस्ताव आयबीएने मांडला असल्याचं अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितलं आहे. (Big News)

Spiritual news | उज्जैनच्या मंदिराचे अद्भूत रहस्य; मूर्ती प्राषण करते…

आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी..

भारतातील सर्व बँकांसाठी सरकारने २०१५ मध्ये एक नवीन नियम लागू केला होता ज्यात बँकेच्या कर्मचाऱ्यांना महिन्यातील २ शनिवारी सुट्टी देण्याचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून देशातील सर्व बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात आणि ही सुट्टी अनिवार्य असून ती सार्वजनिक ते देशातील खाजगी क्षेत्रातील सर्व बँकांना लागू होते. (Big News)

बँकिंग क्षेत्रात १.५ दशलक्षाहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. अशातच अनेक दिवसांपासून आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी समोर येत असून सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात बँकांकडून ही मागणी करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी हा मुद्दा अनेकदा मांडलेला होता आणि अशात भारतातल्या सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका, परदेशी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि आयबीएच्या सदस्यत्वाखालील अखिल भारतीय वित्तीय संस्थांनीही आठवड्यातून ५ दिवस काम करण्याची मागणी करत आहेत. (Big News)

Big Offer! ‘या’ आलिशान SUV वर मिळतेय 11.85 लाखांची तगडी सूट

दर शनिवारी सुट्टीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार का?

दर शनिवारी सुट्टी मिळावी यासाठी आयबीएकडून प्रस्ताव मिळाल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे. मात्र यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जर हा प्रस्ताव मान्य झाला तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ५ दिवस काम करण्याचा लाभ तर मिळेलच, पण त्यासोबतच कामाच्या तासांची संख्याही वाढू शकणार आहे. (Big News)

 

कामाचे तास किती होतील?

बँक कर्मचाऱ्यांना २ दिवसांची सुट्टी दिली तर त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तण्यात येत आहे. बँकांमध्ये ५ दिवस काम करण्याची पद्धत लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना दररोज ४० मिनिटं जास्त काम करावं लागू शकतं तसेच त्यांची कामाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५:३० अशी असू शकते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here