भारतीय बनावटीच्या कफ सिरपच्या बंदीचे कारण आले समोर; वाचून धक्का बसाल !

0
1

दिल्ली : गम्बियातील ६६ जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या भारतीय कंपनीच्या कफ सिरप वर बंदी आणण्यामागचे कारण आता समोर आले आहे.

हरियाणातील मेडेन फार्मास्युटिकल्सच्या कफ सिरपमुळे गम्बियात ६६ निष्पापांचा बळी गेला होता. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने याची गंभीर दाखल घेत सदर कंपनीच्या कफ सिरपच्या उत्पादनावर बंदी आणली आहे. मात्र, मेडेन फार्मास्युटिकल्स कंपनीकडून सदर कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट संपलेल्या पदार्थांचा वापर केल्याचे यात आढळून आले आहे. त्यामुळेच WHOने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, WHOकडून मेडेन फार्मास्युटिकल्सबाबत अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनीपत येथील मेडेन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या चारही कफ सिरपची तपासणी करण्यात येत असून याचे सँपल कोलकाता येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच ७ ऑक्टोबर रोजी मेडेन कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. व त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी मेडेन कंपनीच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली.

कफ सिरप बनवण्यासाठी एक्सपायरी डेट जवळ असलेल्या पदार्थांचा वापर

या तपासणीचा अहवाल नुकताच समोर आला असून या रिपोर्टमध्ये कफ सिरपमध्ये असलेल्या अनेक त्रुटी समोर आल्या आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीकडून तयार करण्यात आलेले कफ सिरप तयार करण्यासाठी एक्सपायरी डेट जवळ असलेल्या सॉल्वेट पदार्थांचा वापर करण्यात आला होता. ज्यात कंपनीने कफ सिरपची खेप तयार केली, तिची एक्सपायरी डेट नोव्हेंबर २०२४ होती. पण यात वापरण्यात आलेल्या प्रोपीलीन ग्लायकोलची एक्सपायरी डेट सप्टेंबर २०२३ची होती.

तसेच, कंपनीने गुणवत्ता परिक्षणावेळी सॉल्व्हेंट्समध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकॉलची चाचणी केली नाही. धक्कादायक म्हणजे, या चारही कफ सिरपच्या उत्पादनाची तारीख डिसेंबर २०२१ ची दाखवण्यात आली पण तिचे उत्पादन २०२२ मध्ये करण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये या कफ सिरपच्या उत्पादनासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली होती. मुख्य म्हणजे , या चाचणीचा मुख्य परीक्षण अहवाल गायब होता. त्यामुळेच हे सिरप अनेकांच्या मृत्यूचे कारण बनले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here