Skip to content

अनर्थ टळला मात्र अपघात घडला दोन गंभीर जखमी ; लोकप्रतिनिधी रस्त्याकडे लक्ष देणार का ?


सोमनाथ जगताप | देवळा
देवळा – सटाणा राज्यमार्गावर आहेर वस्ती नजीक बस व कार यांच्यात अपघात होऊन कारमधील दोघे जण गंभीर झाले आहेत. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येऊन पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आले .

देवळा – सटाणा राज्यमार्गावर आहेर वस्तीवर झालेल्या अपघातात कारचा झालेला चक्काचूर ( छाया-सोमनाथ जगताप )

देवळा पोलिसांत मोटर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि ,शुक्रवारी दि १४ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास देवळा – सटाणा राज्यमार्गावर सटाण्याच्या दिशेने जात असलेली नाशिक -साक्री एस टी बस ( क्रमांक एम एच २०/ बी एल १८२४ ) देवळा नजीक आहेर वस्ती जवळ समोरून येणारी कार (क्रमांक एम एच ०४ /इ एच ४१२) ने बसला धडक दिली .

या भीषण अपघातात कार मधील समाधान कापडणीस ( ३५) रा जायखेडा ता बागलाण व पवन मन्साराम चव्हाण ( ३४) रा ब्राम्हणवाडे ता बागलाण हे दोघे जण गंभीर जखमी झाले . बस चालकाच्या प्रसंगा वधामुळे पुढील मोठा अनर्थ टळला . यात कारचा चक्काचुर झाला असून ,कार मधील दोघांना देवळा ग्रामीण रुग्नालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्नालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघाताचा देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ , चंद्रकांत निकम करीत आहेत . दरम्यान , सोग्रस ते देवळा व देवळा ते सटाणा या राज्यमार्गाची अतिशय दयनीय अस्वस्था झाली असून , रॊजच छोट्या मोठ्या अपघातांची मालिका सुरु आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग अजून किती लोकांचे बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांनी उपसस्थित केला असून ,लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या राज्य मार्गाची तात्काळ दुरूस्ती करावी ,अशी मागणी जोर धरू पाहत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!