हिमाचल प्रदेशात निवडणुकीचे बिगुल वाजले; वाचा कधी होणार आहे मतदान ?

0
26

दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हिमाचल प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १२ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आजपासून तिथे आचारसंहिता लागू झाली आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक ही एकाच टप्यात होणार आहे. १७ ऑक्टोबरपासून निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात होईल, तर अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही २५ ऑक्टोबर आहे. १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील ६८ जागांसाठीचे मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशात कुणाची सत्ता येणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आजपासून हिमाचल प्रदेशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी यावर अधिक माहिती दिली की, हिमाचल प्रदेशमध्ये ५५ लाख ०७ हजार २६१ मतदार आहेत. यामध्ये २७ लाख ८० हजार पुरुष, तर २७ लाख २७ हजार महिला मतदार आहेत. त्याशिवाय दिव्यांग मतदारांची संख्या ५६ हजार इतकी असून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या एक लाख ८६ हजार इतकी आहे. हा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी हिमाचल प्रदेशमधील सर्व राजकीय पक्ष, राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधी माहिती व अहवाल मागवण्यात आले होते. तसेच, त्यावर आगामी उत्सवांच्या तारखा लक्षात घेऊन मतदानाचे दिवस निश्चित करण्यात आहे. त्याचवेळी गुजरात निवडणुकीचीही घोषणा केली जाण्याची शक्यता होती, मात्र आयोगाने दिवाळीनंतर  जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे जानेवारीआधीच नवीन सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. गेल्यावेळी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ६८ पैकी ४४ जागा, काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. पण या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेससह आम आदमी पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 

  • अर्ज भरण्यास सुरुवात- १७ ऑक्टोबर २०२२
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख- २५ ऑक्टोबर २०२२
  • अर्जाची छानणी- २७ ऑक्टोबर २०२२
  • नाव माघारी घेण्याची मुदत- २९ ऑक्टोबर २०२२
  • मतदान- १२ नोव्हेंबर २०२२
  • मतमोजणी व निकाल- ८ डिसेंबर २०२२

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here