इसको बोलते है सर तनसे जुदा…! ‘अप्रतिम, शानदार, अप्रतिम, जय हो…’, भारताच्या विजयावर नेत्यांनी व्यक्त केला आनंद

0
2

मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली, ज्याने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या, जे टीम इंडियाने 6 विकेट गमावून पूर्ण केले. यानंतर राजकीय नेत्यांनी मात्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एकीकडे टीम इंडियाच्या या विजयाची सर्वत्र चर्चा होत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातही या विजयाचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. टीम इंडियाच्या या विजयावर गृहमंत्री अमित शाह यांनी लिहिले की, T20 विश्वचषक सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली आहे. विराट कोहलीने काय खेळी खेळली आहे जबरदस्त. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की… जिंकण्याची सवय आहे… टीम इंडियाचा अभिमान आहे… जय हो.

दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गोव्यातील कॅथोलिक विद्यापीठात एका परिषदेला संबोधित केल्यानंतर ट्विट केले की, भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी माझे विमान सोडले. आता पुढील फ्लाइट सकाळी ९.५५ वाजता आहे. मला या स्पर्धेचा हा सामना बघायचा होता. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की काय अप्रतिम सामना होता. विराटच्या उत्कृष्ट खेळामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार विजय मिळवला. विश्व T20 मध्ये भारताच्या विजयी सुरुवात केल्याबद्दल टीम इंडिया आणि सर्व देशवासियांचे अभिनंदन. ही विजयाची घोडदौड कायम ठेवत आम्ही विश्वचषक जिंकूनही आणू.

नितेश राणे यांनी वादग्रस्त ट्विट करत, इसको बोलते है सर तनसे जुदा…! ‘ असे म्हटले आहे यावर नेटकऱ्यानी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here