यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कशी होणार : ऐन सनासुधीत अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल

0
2

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : कोरोनाच्या आर्थिक संकटानंतर उसनवारी करत का होईना इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा धीर धरत शेतीकडे लक्ष्य दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी करत दुबार पेरणी केली तर अनेक शेतकऱ्यांनी आयात भाताची रोपे आणत भात लागवड केली.

गेल्या पन्नास वर्षांमध्ये झाला नाही असा पाऊस यंदा धो धो बरसला आणि याच ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे इगतपुरी तालुक्यात अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झाला.असच काहीसं इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील नगर-नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या म्हैसवळण घाट माथ्याच्या खाली असलेल्या अडसरे बु येथील फळविरवाडीतील पाझर तलाव एक सप्टेंबर च्या रात्री मोठ्या प्रमाणात झालेल्या ढगफुटीमुळे फुटला आणि क्षणार्धात या परिसरात सर्वत्र जलप्रलयाचे तांडव बघायला मिळाले यात या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या जमीन दोस्त झाल्या.या परिसरात सोनोशी, गोडेवादी, बाडगीची माची, ठोकळवाडी, धानोशी यांसह बहुसंख्य भागात अनेक शेतकऱ्यांचे जमिनीचे बांध फुटले.

भात शेतीत डोंगर उतारावरील पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली दगड माती रेताड बसले, तर अडसरे बु ते भंडारदरावाडीला जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे वाहून गेला अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी,बोअरवेल बुजल्या तर काही शेतकऱ्यांना जमिनीच शिल्लक राहिल्या नाहीत अश्या परिस्थितीत येथील नुकसानीची राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेंमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह अनेक आजी माजी लोकप्रतिनिधिंनी प्रत्यक्ष पाहणी केली. अनेकांनी आठ दिवसांत रस्ता तयार करू बंधारा बांधून देऊ ,नुकसानीची पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देखील देण्यात येईल असे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन पण दिले त्यानंतर ते आजपर्यंत या भागात या भागातील शेतकऱ्यांना आद्यपही कोणतीही मदत झालेली नाही असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या भागातील वाहून गेलेला अडसरे ते भंडारदरावाडी रस्ता देखील दुरुस्ती न झाल्याने या भागातील जवळपास दोनशे कुटुंबांसह शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला आहे.

दिवाळीच्या सुट्टी नंतर तरी हा रस्ता विद्यार्थ्यांना उपयोगात येईल का हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा एकमेव मुख्य श्रोत म्हणून असलेला फळविरवाडी पाझर अद्यापही दुरुस्ती न झाल्याने यंदा येथील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावी लागणार आहे. त्यात रोज बरसत असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, टोमॅटो, काकडी, कांदा रोपे अन्य बागायती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अश्या परिस्थितीत यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी तरी गोड होणार का शेतकऱ्यांना सरकार दिवाळीत गोड करणार का अशी आशा शेतकऱ्यांच्या मनात घर धरून आहे.

दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासादायक नुकसानभरपाई त्वरित वर्ग करावी, फळविर वाडी येथील पाझर तलाव लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावा, तसेच अडसरे बु ते भंडारदरावाडी येथील वाहून गेलला रस्ता नव्याने बनविण्यात यावा अशी मागणी स्थानिक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. अश्या संकटात हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने ऐन दिवाळीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

“अतिवृष्टीमुळे फळवीर वाडीतील फुटलेला बंधारा शासनाने त्वरित दुरुस्ती करण्यात यावा जे ने करून याठिकाणी किमान शेतकऱ्यांना मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल.यासोबतच अडसरे बु ते भंडारदरा वाडी रस्ता त्वरित दुरुस्ती करून नव्याने करण्यात यावा म्हणजे या भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचा दैनंदिन येण्या जाण्याचा मुख्य मार्ग मोकळा होईल.”
किरण साबळे मनविसे गटप्रमुख अडसरे बु.

 

एक सप्टेंबर च्या रात्री झालेंक्या अतिवृष्टीमुळे आमच्या भागातील माझ्यासह अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उभ्या पिकांसह वाहून गेल्या हे न भरून येणारे नुकसान झाले आहे किमान शासनाने वाहून गेलेल्या जमिनी तरी दुरुस्ती करून द्याव्यात हीच माफक अपेक्षा आहे.”
नितीन गोडे ,शेतकरी सोनोशी

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here