IIT Delhi | आयआयटी दिल्लीच्या वसतिगृहात नाशिकच्या तरुणाची आत्महत्या

0
32
IIT Delhi
IIT Delhi

IIT Delhi | गेल्या काही महिन्यांपासून नशिक हे शहर सतत कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत आहे. आधी ललित पाटील ड्रग्स प्रकरणामुळे त्यानंतर त्यावरून रंगलेल्या राजकीय वाद विवादामुळे. आता कुठे हे प्रकरण मिटते कुठे की, नाशिकमध्ये सातत्याने होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे नशिक चांगलेच चर्चेत होते.

आता यात भर पडली ती नुकत्याच नशिक शहरातील एका नामांकित शाळेतील एका विद्यार्थीनीच्या बॅगेत सापडलेल्या ई-सिगारेटची. या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या बॅगमध्ये ई-सिगारेट आढळली असता, शिक्षकांनी पालकांना कळवले. याच्या रागातून या मुलीने शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती. दरम्यान, ही घटना ताजीच असताना आता आणखी एक खळबळजनक घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. (IIT Delhi)

Spa Center | नाशिकमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालू होता वेश्या व्यवसाय

IIT Delhi | नेमकं प्रकरण काय..?

नाशिकमधील वरद संजय नेरकर या विद्यार्थ्याने दिल्लीच्या आयआयटी द्रोणागिरी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. द्रोणागिरी वसतिगृहाच्या ७५७ क्रमांकाच्या खोलीमध्ये २२ वर्षीय विद्यार्थ्याने गुरुवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या केली असून, हा मृत विद्यार्थी मूळचा नाशिक शहरातील रहिवासी आहे.

वरद संजय नेरकर (रा. हनुमानवाडी, पंचवटी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा विद्यार्थी अभ्यासात हुशार असल्याने त्याला आयआयटीत शिक्षण घेत असतानाच एक चांगल्या पगाराची नोकरीसुद्धा मिळालेली होती. त्याच्या आत्महत्येची बातमी नाशिकमध्ये पोहोचताच त्याचे नातेवाईक व मित्र परिवारात शोककळा पसरली होती.(IIT Delhi)

Nashik Crime | नाशिकमधील नामांकित शाळेत व्यसनाधीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकच्या पंचवटी परिसरातील हनुमानवाडी येथील वरद नेरकर हा विद्यार्थी दिल्लीच्या आयआयटीमध्ये ‘एम.टेक’च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. दरम्यान, गुरुवारी रात्री त्याच्या पालकांनी त्याला फोन केला असता, त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने नेरकर कुटुंबियांनी त्याच्या दिल्लीतील काही मित्रांना फोन केला. त्याच्या मित्रांनी वरदच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर त्याच्या मित्रांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने त्याच्या रूमचा दरवाजा तोडला. यावेळी वरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बातमी नेरकर कुटुंबीयांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. यानंतर नेरकर कुटुंबीय तातडीने दिल्लीला रवाना झाले.

दरम्यान, मृत वरद याचे वडील हे नाशिक महापालिकेत लिपिक या पदावर कार्यरत असून, त्याचे शिक्षण हे नाशिकच्या आदर्श माध्यमिक विद्यालयात झाले आहे. यानंतर त्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.  तर, शुक्रवारी (दि. १६) वरदच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.(IIT Delhi)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here