Igatpuri | इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरात अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या फोफावत चालल्याने घोटी पोलिसांनी दमदार कारवाईला सुरुवात केली आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील घोटी पोलीस ठाणे व खेड ग्रामपंचायत हद्दीतील देवाची वाडी परिसरात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर घोटी पोलिसांकडून धाड टाकल्या जात असून गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई केल्या जात आहे.
Igatpuri | गोवर्धने महाविद्यालयात विशाखा समिती अंतर्गत मुलींना आरोग्य व सुरक्षितेविषयी मार्गदर्शन
पोलिसांचा हातभट्टीवर बेधडक छापा
बुधवार ता.१६ दरम्यान घोटी पोलीस हद्दीत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मीरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरक्षक विनोद पाटील यांनी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत देवाची वाडी, खेडभैरव येथे पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, पोलिस हवालदार ३५१ श्रीकांत खैरे, पोलीस नाईक शिवाजी शिंदे, पोलीस शिपाई योगेश यंदे यांच्या पथकाने गावठी दारू तयार करण्याच्या हातभट्टीवर बेधडक धाड मारून छापा टाकला व कारवाई करत सदरची अवैध गावठी दारू हातभट्टी उध्वस्त करून १,४६,२०० रुपयांचे मुद्देमाल पकडून कडक कारवाई केली. घोटी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रॉव्हिजण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सतीश शेलार करीत आहेत.
“घोटी पोलीस ठाणे हद्दीतील खेड भैरव- देवाची वाडी येथील अवैध गावठी दारूची हातभट्टी आमच्या पोलीस पथकाने धाड मारून उध्वस्त करून कडक कारवाई केली आहे. यानंतर घोटी पोलीस ठाणे हद्दीत एकही अवैध गावठी दारू हातभट्टी दिसणार नाही.”
– विनोद पाटील, पोलीस निरीक्षक घोटी पोलीस ठाणे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम