Igatpuri | आ. कोकाटेंच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच नांदूरकीपाड्यात पोहोचला रस्ता

0
41
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | देशाला स्वातंत्र्य मिळवून आज जवळपास 76 वर्ष पूर्ण झाले आणि एकविसाव्या शतकात महासत्ता बनू पाहणाऱ्या देशात या अँड्रॉइडच्या युगात मोठ्या थाटात 75 वा अमृतमहोत्सव सर्वत्र देशभरात मोठ्या थाटात आनंदात साजरा करण्यात आला. परंतु याच 75 व्या अमृत महोत्सवाची किरणं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सहयाद्रीच्या कुशीत असणाऱ्या वाड्या वस्त्यांमध्ये पोहचले का..? असा प्रश्न उपस्थित केला. तर नक्कीच नाही असे उत्तर मिळेल. परंतु याच डोंगर दऱ्यांमधील दुर्मिळ वाड्या पाड्यांमध्येदेखील आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीला जमलं नाही. ते सिन्नर इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे यांनी करून दाखवलं आहे.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील डोंगराळ भागात रहिवास करणाऱ्या शेवटच्या घटक असलेल्या आदिवासी बांधवांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जाणीवपूर्वक लक्ष्य देत आमदार माणिकराव कोकाटे यांनी तेथील विकासकामांना चालना दिली आहे. असेच काहीसे उदाहरण म्हणजे इगतपुरी तालुक्यातील सहयाद्री पर्वत रांगेच्या कुशीत असलेल्या आंबेवाडी येथील नांदूरकीपाड्याचे. अंदाजे तीन चारशे लोकवस्ती असलेल्या आंबेवाडी येथील नांदूरकीपाड्यात स्वातंत्र्य काळापासून रस्त्याची सुविधा नव्हती.

Igatpuri | लायन्स क्लब यांचे संयुक्त विद्यमाने इगतपुरीमध्ये जिल्हा परिषद शाळेचे ‘रोल मॉडेल’

रस्ता नसल्याने येथील गोरगरीब आदिवासी बांधवांना खडतर प्रवास करत अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत. कुणी अचानक आजारी पडले तर रुग्णवाहिका पोहचणेही कठीण अशी परिस्थिती असलेल्या नांदूरकीपाड्यातील शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांना आजवर पायपीट करत खड्ड्या खुड्ड्यात संघर्षाची मोठी वाट तुडवत जीवनप्रवास करावा लागत होता.

येथील शेतकरी ग्रामस्थांची हीच परिस्थिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी लक्षात घेतली व जवळपास ४० लाखांचा निधी उपलब्ध करून देत आंबेवाडी ते थेट नांदूरकीपाडापर्यंत डांबरी रस्ता मंजूर केला व स्वातंत्र्य काळानंतर प्रथमतः नांदूरकी पाड्यात रस्ता पोहचला. तेथील ग्रामस्थांची रस्त्याची गैरसोय दूर झाली. दरम्यान नांदूरकीपाडा येथे पहिल्यांदाच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून रस्ता केल्याने तेथील ग्रामस्थांनी आमदार कोकाटे यांचे आभार मानले आहेत. अखेर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नांदूरकीपाड्यातील ग्रामस्थांना चांगला डांबरीकरण रस्ता उपलब्ध झाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.

Igatpuri | इगतपुरीत पहिल्या पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांकडून खरीपाच्या मशागतीला सुरुवात

स्वातंत्र्य काळापासून ते आजपर्यंत नांदूरकी पाड्यातील १ कीमी अंतराच्या रस्ता प्रश्नाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने आजवर लक्ष्य दिले नाही अखेर आमदार माणिकराव कोकाटे यांनी आमच्या रस्ता प्रश्नांची दखल घेतली व आम्हाला चांगला रस्ता उपलब्ध करून दिला.
– गुलाब मेंगाळ (ग्रामस्थ, नांदूरकीपाडा)

आमदार माणिकराव कोकाटे यांनी आमच्या रस्ता प्रश्नाची सोडवणूक केल्याने स्वातंत्र्यानंतर शाळेतील विद्यार्थी जेष्ठ नागरिक ग्रामस्थांचा संघर्ष दूर झाला आहे. आमदार कोकाटे यांनी नुसते बोलून नाही तर करून दाखवले आहे.
– दौलत भले (ग्रामस्थ, नांदूरकीपाडा)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here