Pankaja Munde| चारित्र्यहीन, नितीमत्ता नसलेल्या आणि पैशांच्या जोरावर निवडून येणा-या लोकांना आता मी पाडणार असा एल्गार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड येथे आयोजित दसरा मेळाव्यात केला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा इशारा नेमका कोणाकडे होता? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिंकून येण्यासाठी तुम्ही स्वतःची निष्ठा गहाण टाकू शकत नाही. असा घरचा आहेर त्यांनी नाव न घेता भाजपला दिला आहे. २०२४ पर्यंत माझ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी स्वतः मैदनात उतरणार आहे. असे सांगत पंकजा मुंडे यांनी निवडणुका लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्रात सध्या पक्ष फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण आणि काही घडामोडींमुळे वातावरण ढवळून निघाले आहे. मागील पाच वर्षे मी पक्षासाठी मरमर निष्ठेने काम केले आहे. मध्यप्रदेश, तसेच परळी मतदार संघात काम केले. आपल्या भगवान बाबांनासुद्धा दुसरा गड बनवावा लागला, भगवान श्री कृष्णाला सुद्धा त्यांची मथुरा सोडावी लागली, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
Dada Bhuse| दादा भुसेंनी धाडली सुषमा अंधारेंना नोटिस…
पंकजा मुंडे म्हणाल्या, मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावे लागले. माझ्यामुळे ह्या स्टेजवर बसलेल्या लोकांना त्रास कमी होतो मात्र माझ्या जनतेला जास्त त्रास होतो. दर वेळी माझ्यामुळे तुमचा नेहमी अपेक्षाभंग होतो. त्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते. कोणी म्हणते ताई ह्या पक्षात चालल्या, तर कोणी म्हणते त्या पक्षात चालल्या. दुसऱ्या पक्षात जावी इतकी पंकजा मुंडेची निष्ठा लेचीपेची नाही. आता जे आपल्याला त्रास देतात त्यांचे घर आपण उन्हात बांधू. आता माझ्या माणसांना मी त्रास होऊ देणार नाही.
पंकजा मुंडेच्या आजच्या ह्या दसरा मेळाव्याच्या भाषणादरम्यान माइक मध्येच बंद झाला होता. तर यावेळी कोणीतरी मुद्दाम वायर कापल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला होता. यानंतर माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता भाजपवर टीका केली. माझा आवाज हा सगळ्या देशात पोहचला पाहिजे. आणि आता मी माझ्या लोकांना फक्त स्वाभिमानच देऊ शकते असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
Gold Silver Prices Down| दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने, चांदीचे दर घटले…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम