Assembly Election Result | नाशकात विद्यमान आमदारांनी गड राखले; आज ‘या’ उमेदवारांनी उधळले विजयाचे गुलाल

0
33
#image_title

Assembly Election Result | विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले असून महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत सत्ता राखली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी मिळाली आहे.

Assembly Election Result | बागलाणमध्ये दिलीप बोरसेंच्या हाती विजयाचा झेंडा!

हिरामण खोसकर 86 हजार मतांनी विजयी

जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा विजय मिळवला असून दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तब्बल 41 हजार मतांनी निवडून आले आहेत. त्याचबरोबर, देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे 40 हजार मतांनी विजयी झाल्या असून इगतपुरीतून हिरामण खोसकर 86 हजार मतांने निवडून आले आहेत. कळवण मधून नितीन पवार 8 हजार तर सिन्नरमधून माणिकराव कोकाटे 40 हजार मतांनी निवडून आले. त्याचबरोबर निफाडमधून दिलीप काका बनकर हे 28 हजार मतांनी विजयी झाले.

Assembly Election Result | नाशिक पश्चिममध्ये सिमा हीरे तर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ आघाडीवर

दादा भुसे एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी

त्याचबरोबर, महायुतीतील भाजपकडून पश्चिम मतदार संघातून सीमा हिरे यांनी 70 हजार मतांनी विजय प्राप्त केला असून नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे 17 हजार मतांनी विजयी झाले. तर चांदवडमध्ये डॉ. राहुल आहेर 48 हजार मतांनी, बागलाण मधून दिलीप बोरसे 1 लाख 29 हजार 638 मतांनी व नाशिक पूर्वतून राहुल ढिकले 70 हजार मतांनी विजयी झाले आहेत. तसेच शिंदे सेनेचे दादा भुसे मालेगाव बाह्य मतदार संघातून 1 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले आहे. तर सुहास कांदे नांदगावातून 80000 मतांनी विजयी झाले आहेत. याशिवाय मालेगाव मध्य मधून एमआयएमचे मोहम्मद मुफ्ती इस्माईल हे 85 मतांनी विजयी झाले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here