Deola | विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला असून या मतदारसंघात चौरंगी लढत होती. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून नाशिक जिल्ह्यातील 15 ही मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होत आहे. बऱ्याच ठिकाणी अजूनही मत मोजणी सुरू आहे.
Deola | देवळ्यातील जनता दादांसोबत; राहूल आहेरांची आघाडी कायम
देवळा-चांदवड मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राहुल आहेर यांना उमेदवारी देण्यात आली. तर महाविकास आघाडी करून शिरीषकुमार कोतवाल हे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार केदा आहेर व प्रहारचे गणेश निंबाळकर यांचे देखील आव्हान होते. परंतु देवळा-चांदवड मतदारसंघात भाजपच्या राहुल आहेर यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली आहे.
Deola-Chandwad | देवळा-चांदवड मतदारसंघात तीसऱ्या फेरीत भाजपचे राहूल आहेर आघाडीवर
राहुल आहेरांची आघाडी कायम
मतमोजणीच्या विसाव्या फेरीअंती राहुल आहेर यांना 2,938, केदा आहेर यांना 1,202, गणेश निंबाळकर यांना 5,461 तर शिरीष कुमार कोतवाल यांना 1,363 मत मिळाली आहेत. तर राहुल आहेर 52 हजार 206 मतांनी आघाडीवर आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम