अजून किती मुलींचे MMS झाले व्हायरल ? ; विद्यार्थी आंदोलन पेटले, कॉलेज बंद

0
2

द पॉईंट नाव: पंजाब, चंदिगड येथील मोहालीत एका नामांकित विद्यापीठात सुमारे ६० विद्यार्थिनी अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणातील अजून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. सहकारी विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करणारी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराचे व्हाट्सअप चॅट समोर आले आहेत. ज्यामध्ये आरोपी मुलाने मुलीला डेटा डिलीट करण्यास सांगितले, दोघांमध्ये ठराविक काही कन्टेन्ट आणि एक फोल्डर हटवण्यास सांगितल्याचे व्हाट्सअप चॅट वरून समोर आले आहे

त्याचबरोबर पंजाब सरकारने याप्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री मान म्हणाले की सखोल चौकशी करण्यात येईल, तसे आदेश देखील दिलेत अशी माहिती ट्विट करून भगवंत मान यांनी दिली आहे मान पुढे बोलले की घटना दुर्दैवी आहे वेदना झाल्या आहेत. आमच्या मुली हा आमचा अभिमान आहे. या घटनेची खगोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, अफवा टाळा.”

चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरु सिंह संधू म्हटले पोलिस कसून चौकशी करत असून लवकरच सत्य बाहेर येईल, आम्ही देखील हवी ती मदत करत आहोत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला अटक त्याचवेळी, रिपोर्टनुसार, आरोपी विद्यार्थिनीने मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ तिच्या शिमल्यात असलेल्या तिच्या प्रियकराला पाठवला होता, तरुणाने तो व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

विद्यार्थिनींचा व्हिडिओ व्हायरल होताच चंदीगड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि विद्यार्थिनींनी वसतिगृहात जोरदारपणे आंदोलन केले. मुलींनी ‘वुई वॉन्ट जस्टिस’च्या घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान उपस्थित झालेली विद्यार्थ्यांची आक्रमक स्थिती बघता काही विपरीत घडण्याआधी आणि गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

या प्रकरणात मात्र कॉलेज प्रशासनाने व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी खोटी आणि निराधार असल्याचे फेटाळून लावले.

पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरप्रीत देव यांनी पत्रकारांना सांगितले की, असे दिसते की आरोपी विद्यार्थिनीने स्वत:चा एक व्हिडिओ तरुणांसोबत शेअर केला आहे आणि इतर कोणत्याही विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले नाही. विद्यापीठाच्या वसतिगृहात अनेक विद्यार्थिनीं राहतात त्यातील साठ विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवून आणि सोशल मीडियावर शेअर केले गेले आणि या प्रकरणानंतर साठ विद्यार्थिनींपैकी अनेक जणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा दावा करणारी

बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगून विद्यापीठ अधिकाऱ्यांनीही आरोप फेटाळून लावले.

मात्र, रविवारी सायंकाळी विद्यापीठ परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केले. काही आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर या प्रकरणावर पांघरून टाकत असल्याचे आरोप केले. बहुतांश आंदोलकांनी काळे कपडे घातले होते आणि पोलिसांच्या उपस्थितीत ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणा दिल्या. मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक विवेक शील सोनी यांनी पत्रकारांना सांगितले की, अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ लीक झाल्याच्या अफवा पसरल्यानंतर मध्यरात्रीनंतर विद्यापीठात आंदोलन करण्यात आले..ते म्हणाले की, अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आला असून विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही आणि या प्रकरणात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. अधिका-यांनी सांगितले की, आयपीसी कलम ३५४ सी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणात दुपारी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here