Skip to content

फक्त एका फोटोसाठी राज्यपालांनी भारतीय फुटबॉल स्टारशी केले गैरवर्तन, चाहत्यांमध्ये संतापाची लाट


मुंबई – काल कोलकात्यात पार पडलेल्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेतील बक्षीस वितरणादरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारासोबत असे वर्तन केले होते, ज्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी व फुटबॉलच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

झाले असे की, काल ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बंगळुरु एफसीने मुंबई सिटी एफसी संघावर २-१ फरकाने मात देत चषकावर नाव कोरले आहे. ह्यात कर्णधार सुनील छेत्रीसह संघाच्या इतर खेळाडूंनी शानदार कामगिरी करत आशियातील सर्वात जुना असा चषक जिंकला.

मात्र बक्षीस वितरणावेळी संघातर्फे कर्णधार सुनील छेत्री चषक स्वीकारत असताना पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन यांनी आपण फोटोत योग्यप्रकारे येण्यासाठी चक्क सुनीलला बाजूला हटवल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सोशल मिडीयावर अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत आहे.

केवळ कर्णधार सुनीलसोबतच नाही, तर बंगळुरूच्या विजयाचा हिरो असलेल्या शिवशक्ती या खेळाडूसोबतही घडला. शिवशक्तीसोबतही एका राजीक्या नेत्याने अशाचप्रकारे धक्का दिल्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, हे नेते पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री आहे.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार असलेल्या सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये वैयक्तिक गोल्सच्या यादीत रोनाल्डो, मेस्सीनंतर त्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे त्याची तुलना महान फुटबॉलर्सबरोबर केली जाते. असे असूनही एका महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याने अनेक क्रीडाप्रेमी व फुटबॉल चाहत्यांनी सोशल मिडीयावर आपला राग व्यक्त केला आहे. तसेच काहींनी राज्यपालांचे अभिनंदन करत त्यांच्यावर खरमरीत टीकाही केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!