हरिहर गडावर अडकलेल्या चार पर्यटकांची सुखरूप सुटका

0
7

त्र्यंबकेश्वर – हरिहर गडावर अडकलेल्या पर्यटनासाठी आलेले मालेगावच्या चार पर्यटकांची प्रशासन, वनविभाग व स्थानिकांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

हरिहर गड हा जिल्ह्यातील अतिदुर्गम किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. ज्यामुळे येथे अनेक पर्यटक भेट देत असतात. मात्र, पावसाच्या पार्श्वभूमीवर गडावरील पर्यटनास बंदी असतानाही पर्यटक अनेक इथे येत असतात. काल हे चौघे पर्यटक हरिहर गडावर ट्रेकिंग वरून परतताना रात्री उशिरा डोंगरावरील धुक्यांमुळे त्यांची वाट चुकली. दरम्यान, हे चौघे पर्यटक गडावर अडकल्याची खबर प्रशासनाला मिळाली.

यावेळी पर्यटकांची सुटका करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, वनविभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी यांनी एकत्र येत पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. अखेर वनरक्षक बचाव पथकाने संपर्क साधत रात्री उशिरा त्यांना सुरक्षितपणे गडाखाली उतरवण्यात यश आले.

मागील अनेक दिवसांपासून जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळांवर बंदी घातली होती. त्यामुळे पर्यटकांचा ओघ कमी झाल्याचे दिसून येत होता. पण प्रशासनाचे दुर्लक्ष होताच अनेक पुन्हा एकदा पर्यटक त्र्यंबक परिसरातील पर्यटनस्थळांकडे गर्दी करू लागल्याचे चित्र दिसते. वातावरणातील सततच्या बदलांमुळे पर्यटनस्थळांवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. ह्यावर वनखात्याने त्वरित उपाययोजना राबवण्याची मागणी अनेकांनी केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here