Skip to content

आनंदाचा शिधा देवळा तालुक्यात पोहचला ; हनुमंतपाडा येथे झाला शुभारंभ


देवळा | सोमनाथ जगताप
शिंदे -फडवणीस सरकारकडून दिवाळी निमित्त देण्यात येणारा आनंदाचा शिधा ( किट ) देवळा तालुक्यात पोहचला असून ,त्याचा शुक्रवारी दि २१ रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील अतिदुर्गम अशा हनुमंतपाडा गावात करण्यात आला. येन दिवाळीत सर्वसामान्य जनतेला शिधा मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

देवळा ; दिवाळी निमित्त सरकारकडून आलेल्या आनंदाचा शिधा हनुमंतपाडा गावांत लाभार्थ्यांना वितरित करतांना तहसीलदार विजय सूर्यवंशी समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण ,सरपंच छाबाबाई माळी , उप सरपंच संगीता पवार, हेमराज सोनवणे , तलाठी उमेश गोपनारायण आदी . ( छाया -सोमनाथ जगताप )

शिंदे -फडवणीस सरकारकडून राज्यातील गोर गरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी १०० रुपयात प्रत्येकी एक किलो साखर , तेल ,रवा व चणा दाळ देण्यात येणारा असल्याची घोषणा करण्यात आली होती . त्याची सरकारने अंबलबजाबणी पूर्ण केली केली असून , तो शिधा तालुक्यातील रेशन दुकांदाराना वितरित करण्यात आला आहे . त्याचा शुभारंभ शुक्रवारी २१ रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते तालुक्यातील अतिदुर्गम अशा हनुमंतपाडा या आदिवासी वस्तीवर करण्यात आला .

सरकारकडून ऐन दिवाळीत रेशन मधून मिळालेल्या या वस्तूंमुळे नागरिकांना हातभार लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे . यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण , सरपंच छाबाबाई माळी , उप सरपंच संगीता पवार , ग्रामसेविका राजश्री देसले ,हेमराज सोनवणे, हर्षद मोरे , तलाठी उमेश गोपनारायण ,दुकानदार प्रकाश सोनावणे , दिनेश मोरे आदींसह लाभार्थी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!