Gulabrao Patil | आमच्यामुळेच भाजप सत्तेत, शिंदेंच्या बड्या नेत्याने मेळव्यातच मांडले गाऱ्हाणे

0
11
Gulabrao Patil
Gulabrao Patil

Gulabrao Patil |  आज राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडले. यातून महायुतीचे शक्तिप्रदर्शन करण्याचे आणि विरोधकांना महायुतीची ताकद आणि एकी दाखवण्याचे नियोजन तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या वरिष्ठांनी केले होते. मात्र, यामुळे एकी नाहीतर, महायुतीच्या नेत्यांची नाराजी बाहेर आली. याच मेळाव्यात शिंदे गटाच्या एका नेत्याने भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली आहे.(Gulabrao Patil)

दरम्यान, जळगावमध्ये ‘महायुतीचा कार्यकर्ता मेळावा’ आज संपन्न झाला. या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटिल यांनी भाजपविरोधातील खदखद व्यक्त केली आहे. आम्ही बंड केले त्यामुळेच भाजप सत्तेत आली असल्याचं राज्याचे कॅबिनेट मंत्री व शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील हे म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले की, जर आम्ही बंड केले नसते. तर तुम्हाला सत्ता मिळाली असती का? असा सवालच थेट यावेळी गुलाबराव पाटलांनी भाजपला विचारला आहे. राज्यात महायुतीमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने आज जळगावसह राज्यभरात कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले होते.

Dada Bhuse | कुणी गल्लीत विचारत नाही अन् बाता मात्र…; भुसेंनी राऊतांना फटकारले

Gulabrao Patil | आम्ही धोका पत्करून आपल्यासोबत…

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “तुमच्या वेळेस सगळं बरोबर होतं आणि आमच्याच वेळेला गडबड होत असते असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत गेलो. त्यावेळी आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना काय त्रास सहन करावा लागला. हे फक्त आम्हाला आणि आमच्या कुटुंबालाच माहीती. आमचं काय होईल काय नाही, हे काहीच माहीत नसताना आम्ही धोका पत्करून आपल्यासोबत आलो. याची जाणीव आपण ठेवायला हवी.”(Gulabrao Patil)

आगामी लोकसभा निवडणुका समोर असल्याचं पाहता. आता महायुतीमधील तिन्ही मित्र पक्षातील नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी समन्वय साधत निवडणुकांमध्ये सामील झाल्यास यश नक्की मिळेल. फक्त लोकसभा किंवा विधानसभाच नाहीतर सर्वच निवडणुकांमध्ये आपण एकीने लढायला हवे, अशी अपेक्षा गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

chhagan bhujbal | भुजबळांची कोंडी..?; भुजबळ बंधूंना बजावली नोटिस

गिरीश महाजनांसमोरच मांडले गाऱ्हाणे 

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही भाजपवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मागील अनेक वर्षांपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. परंतु,  शिवसेनेनं कधीही गद्दारी केली नाही. पण माझ्या उमेदवारीच्या वेळीच एका अपक्ष असलेल्या उमेदवाराला पुढे केले गेले.एवढंच नाहीतर नंतर त्यालाच भाजपचे तालुकाध्यक्ष पद देण्यात आले. बाजार समिती निवडणुकांमध्येही भाजपने युतीचा धर्म निभावायला हवा होता. परंतु, त्यावेळीही त्यांनी साथ दिली नाही.

विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन हेदेखील यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर मंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे महायुतीचे घरातील भांडणं आता चव्हाट्यावर आले आहेत.(Gulabrao Patil)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here