Skip to content

Horoscope 15 january | ‘या’ लोकांनी शिवलिंगावर ‘या’ वस्तु अर्पण करा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope 14 April 2024

Horoscope 15 january |   ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तर, कर्क राशीच्या लोकांनी आज बाहेरचे अन्न खाणे टाळावे लागेल. तर, तुमच्यासाठी सोमवारचा हा दिवस कसा असेल? वाचा सर्व १२ राशींचे आजचे राशीभविष्य…

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा त्रासदायक असेल. नोकरदार वर्गाने, आज ऑफिसमध्ये सुरू असलेल्या षडयंत्राबद्दल थोडे सावध असावे. आज कोणी तुमचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करू शकेल. व्यवसायिकांनी आज चिंता करणे टाळावे. तुमची मेहनत कधीही व्यर्थ जाणार नाही, तुम्हाला नफा नक्कीच मिळेल. आग किंवा विजेमुळे काही दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सावध असावे. आज तुम्ही काही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा प्लॅन करू शकता. परंतु आधी जमिनीचे ठिकाण बघून मगच निर्णय घ्यावा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्ही आज गंभीर आजारांबाबत सावध राहायला हवे. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्ही शिवलिंगाला जल आणि दूध अर्पण करा, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.(Horoscope 15 january)

वृषभ राशी –

नोकरदार वर्गाने, आज विशेषतः फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणार्‍या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो.  तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे पद वाढू शकते. व्यवसायिकांनी आज अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांना मोठी तातडीची ऑर्डर मिळू शकते. मात्र, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. तरुणांना आज गॅझेट खरेदी करायचे असेल तर आजचा दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. मात्र, तुम्ही अशा वस्तू अत्यंत काळजीपूर्वक खरेदी कराव्यात.

आज तुम्ही तुमच्या स्वभावात नम्रता ठेवावी, अन्यथा तुमचे कुटुंबीय तुमच्या स्वभावाबद्दल तुमच्यावर टीका करू शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आरोग्याची विशेष काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा. अन्यथा तुमचा घसा दुखू शकतो. जर तुमच्या घरातील कोणताही मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी पात्र असेल तर उद्या त्यांचे नाते पक्के होऊ शकते. आज शिवलिंगावर दूध आणि गंगाजल अर्पण केल्यास तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुमच्या मनालाही शांती मिळेल.(Horoscope 15 january)

Horoscope 13 january | ‘या’ लोकांचा आज आर्थिक फायदा; वाचा आजचे राशीभविष्य

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गाने, जे नव्या नोकरीच्या शोधात आहेत. त्यांनी  प्रयत्न करत रहा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. व्यवसायिकांनी आज कामे जरा सावधगिरीने करावी. कारण, निष्काळजीपणामुळे आज एक प्रकारचा दंड भरावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण ठेवावीत. तरुणांनी प्रियजनांचा अनादर करू नये. तुमच्या कुटुंबातील सदस्य विवाहासाठी पात्र असल्यास एक चांगले नाते उद्या त्यांच्या मार्गावर येऊ शकते. परंतु आपण संपूर्ण तपासणीनंतरच नात्याला हो म्हणावे. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला दातदुखीचा त्रास होऊ शकतो. तुमचे मन आज खूप अस्वस्थ असेल तर तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करू शकता.(Horoscope 15 january)

Horoscope 15 january | कर्क राशी –

नोकरदार वर्गाला आज ऑफिसच्या कामात यश मिळू शकते. मात्र, आज तुम्ही बॉसच्या म्हणण्याला प्राधान्य द्या. अन्यथा, तुमचा बॉस तुमच्यावर रागावू शकतो. व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायात गाफील राहू नये, अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तरुणांना नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला एखाद्या प्रकारचा धक्का लागल्याने तुमच्या मानेमध्ये दुखू शकते. मात्र, जर त्रास वाढला तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज तुम्ही ‘ओम नमः शिवाय’ चा जप करू शकता. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि कामात नफा मिळेल.(Horoscope 15 january)

सिंह राशी –

सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाईल. व्यवसायिकांनी विशेषतः कापड व्यापाऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. सण आणि लग्नाच्या हंगामात कपड्यांची खरेदी असते. तरुणांना वडीलधाऱ्यांची आणि शिक्षकांची साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व समस्यांमधून सहज बाहेर पडू शकाल. आज रागावर नियंत्रण ठेवावे. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला रक्ताशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. आज कोणीतरी नातेवाईक तुम्हाला उधार पैसे मागू शकतात. तुम्ही कोणालाही पैसे उधार देण्याचे टाळावे. तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही भगवान शिवलिंगावर मधाचा अभिषेक करा, तुमची आर्थिक तंगी दूर होऊ शकते.(Horoscope 15 january)

Horoscope 12 january | ‘या’ लोकांनी आरोग्याबाबत सतर्क रहावे; वाचा आजचे राशिभविष्य

कन्या राशी –

सिंह राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस चांगला जाईल. नोकरदार वर्गाने आज त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय राखावा.  तर तुम्हाला प्रत्येक यश सहज मिळवता येईल. व्यवसायिकांनी आज तुमच्या कामगारांशी चांगले वागले पाहिजे. त्यांच्यावर जास्त रागावू नये. तरुणांना आज काही महत्त्वाचे काम असू शकते. ते करताना पूर्ण मेहनतीने काम पूर्ण करा. कुटुंबाशी संबंधित काही प्रकरण असेल तर ते अत्यंत विचारपूर्वक हाताळा. भावनेच्या भरात कठोर निर्णय घेऊ नका. काम आणि विश्रांती यातील समतोल राखा. काम करताना थकवा जाणवत असेल, तर तुम्ही विश्रांती घेऊ शकता. आज शिवलिंगाला अक्षत अर्पण करा, तुमचे शारीरिक त्रास दूर होतील.

तूळ राशी –

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाने, ऑफिसच्या कामात नियमांचे पालन केले पाहिजे, चुकांमुळे तुम्ही काही अडचणीत येऊ शकता. व्यावसायिकांना विशेषतः हॉटेल किंवा रेस्टॉरंट मालकांना चांगला नफा मिळू शकतो. सणासुदीच्या काळात तुमचे उत्पन्न खूप वाढू शकते. तरुणांना करिअर घडवण्याची चांगली संधी मिळू शकते. साखरेच्या रुग्णांनी आज तुमच्या आहारावर लक्ष ठेवा. तुम्ही आज कामात खूप व्यस्त असाल. कुटुंबियांसोबत थोडा वेळ घालवता येईल. तिळापासून बनवलेल्या वस्तू अग्नीत अर्पण कराव्यात, यामुळे तुमचा त्रास कमी होईल.(Horoscope 15 january)

वृश्चिक राशी –

नोकरी वर्गाने आज ऑफिसमधील सहकार्‍यांशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नका. अन्यथा, तुमचे परस्पर संबंध कमकुवत होऊ शकतात. व्यवसायिकांनी व्यवसायाशी संबंधित एखादे नवीन काम करायचे असल्यास त्यासाठीआजचा दिवस चांगला असेल. भगवान शंकराचे नाव घेऊन तुम्ही तुमचे काम सुरू करू शकता. तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच व्यवसायात प्रगती होईल. तरुणांच्या जर कुठल्याही परीक्षेचा निकाल येणार असले तर, निकाल चांगला येऊ शकतो. गरिबांना डाळ, तांदूळ इत्यादी दान करू शकता. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, रक्तदाबाशी संबंधित लोकांना चिंतामुक्त राहावे लागेल. जास्त काळजी केल्याने तुमचे बीपी वाढू शकते.(Horoscope 15 january)

धनु राशी –

नोकरदार वर्गाने, आज ऑफिसमध्ये कोणी मदत मागत असेल तर, त्या व्यक्तीला निराश करू नये. व्यावसायिकांना चांगली ऑफर मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही योग्य उत्पन्न मिळवू शकता. तरुणांनी मनात काही समस्या असल्यास ती सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज कुठलाही कठीण निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. तसेच आज वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या पायाला दुखापत होऊ शकते. तुमचा कोणी नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मागितला तर त्याला निराश करू नका, त्याला शक्य तितक्या मदत करण्याचा प्रयत्न करा.(Horoscope 15 january)

मकर राशी –

ज्या लोकांना परदेशात नोकरी करायची आहे त्यांची इच्छा उद्या पूर्ण होऊ शकते. त्यांना परदेशातून फोन येऊ शकतो. व्यावसायिकांना विशेषतः तेल व्यापाऱ्यांना गुंतवणूकीची चांगली संधी मिळू शकते. वर्तमानात केलेली गुंतवणूक ही तुमचे भविष्य खूप चांगले बनवू शकते. तरुणांना तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील.

तुम्ही आज कौटुंबिक गोष्टींना प्रधानी द्या. तुम्ही तुमच्या पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. अन्यथा, तुमची प्रकृती बिघडू शकते. जास्त तणावामुळे बीपी वाढू शकतो. तुम्ही आज मंदिरात खिचडी किंवा शिरा प्रसाद वाटप करावे. यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि कौटुंबिक संकटे दूर होतील.(Horoscope 15 january)

कुंभ राशी –

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक असू शकतो. नोकरी वर्गाला आज ऑफिसमधील काही कामामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मेहनत करत रहा. यासोबतच तुमच्या जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यवसायिकांना विशेषतः सौंदर्यप्रसाधनांचा व्यवसाय करणाऱ्यांना आज नफा मिळेल. इच्छेपेक्षा जास्त नफा तुम्ही मिळवू शकता. तरुण लोक काम करत असलेल्या प्रकल्पांवबाबत बेफिकीर राहू नका. अन्यथा तुम्हाला अपयश येऊ शकते. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून इच्छित भेट मिळू शकते. गरोदर महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि भगवान श्रीकृष्णाचा नामजप करत राहावे. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशी वाद असतील तर, त्यांचा मन वळवण्याचा प्रयत्न करा आणि हे प्रकरण संपवण्याचाही प्रयत्न करा.(Horoscope 15 january)

मीन राशी –

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. नोकरदार वर्गाने आज ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी समन्वय साधून काम केले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या बॉससोबत जी काही जुनी योजना आखली होती. ती आज यशस्वी होऊ शकते. व्यवसायिकांच्या व्यवसायात आज प्रगती होईल. वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळेल. तरुण आज आपल्या लेखन कलेला चांगले आणि नवीन रूप देऊ शकतात. आज तुम्ही लिहिलेले लेख लोक आवर्जून वाचतील. (Horoscope 15 january)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!