Gold Silver Rate Today | नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच ग्राहकांना सोने-चांदिने खुश केले. हा महिना सामान्य ग्राहकांना लाभदायक ठरला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सोने-चांदिने मोठा पल गाठला होता. त्यामुळे सोने सामान्य ग्राहकांच्या अवाक्या बाहेर गेले होते.
मात्र, या महिन्यात ३ तारखेपासूनच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये लगातार घसरण सुरू आहे. दोन दिवस झालेली किंचित दरवाढ वगळता दरांचा आलेख हा खालीच चालला आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने किंवा चांदीच्या खरेदीचा विचार करत असाल. तर, हा मुहूर्त उत्तम आहे. कारण अशी संधी पुन्हा मिळणे नाही. आजही किंमती खाली आल्या आहेत. दरम्यान, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…(Gold Silver Rate Today)
सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण
या महिन्याच्या ३ तारखेपासून किंमतींमध्ये सलग घसरगुंडी सुरू आहे. १२ ते १५ जानेवारी दरम्यान सोन्याचे दर हे तब्बल ५५० रुपयांनी खाली आले होते. यानंतर १६ जानेवारी रोजी किंमतींमध्ये पुन्हा १०० रुपयांची घसरण झाली. तर, १७ जानेवारी रोजी किंमतीत ३५० रुपयांची घसरण झाली. १८ तारखेला किंमतीत ३०० रुपयांची घसरण झाली होती. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,५५० रुपये असे आहेत. तार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे आजचे दर हे ६२, ७७० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | सोने-चांदीची ‘गूड न्यूज’; असे आहेत आजचे दर
Gold Silver Rate Today | चांदीचेही दर खाली
या नवे वर्षात सोन्यानेच नाहीतर चांदीनेही ग्राहकांना ‘गूड न्यूज’ दिली आहे. ३ जानेवारीपासून चांदीचेही दर खाली उतरताना दिसत होते. मात्र, १० ते १५ जानेवारी या काळात चांदीचे दर पुन्हा १४०० रुपयांनी वर सरकले होते. मात्र, दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा घसरण सुरू झाली आणि किंमती ३०० रुपयांनी खाली आल्या. अनुक्रमे, १७ तरखेला ६०० रुपयांनी, १८ तारखेला दरांमध्ये ४०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७५,५०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)
Gold Silver Rate Today | सोने-चांदी चमकले; असे आहेत आजचे दर
असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे आजचे दर
आज सोने-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार प्रति कॅरेट सोन्याचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत.
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६१,९२७ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६१,७२२ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५६,७६५ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,४७८ रुपये,
तर, १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,२५३ रुपये असे आहेत.
दरम्यान, आज एक किलो चांदीचा भाव हा ७०,८९८ रुपये असा आहे.(Gold Silver Rate Today)
(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कुठलाही दावा करत नाही. तसेच, वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेललेरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम