Gold Silver Rate Today | सोने-चांदी खरेदीची हिच योग्य वेळ; असे आहेत दर

0
45
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Rate Today |  या महिन्याच्या सुरूवातीला अर्थसंकल्पाच्या काळात सोने-चांदित दरवाढ झाली होती. गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवसांत आणि या महिन्याच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत सोने-चांदीच्या किंमती या वाढल्या होत्या. मागील महिन्यात सोने-चांदीत सलग घसरणीचे सत्र सुरू होते. किरकोळ दरवाढ वगळता सतत दर घसरतानाच दिसले. मात्र, यामुळे सामान्य ग्राहकांना याचा मोठा फायदा झाला. पूर्ण जानेवारी महिन्यात सोन्याच्या किंमती तब्बल २,२०० रुपयांनी तर चांदीच्या किंमती ४,४०० रुपयांनी खाली आल्या. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती केवळ ३०० रुपयांची तर चांदीच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ झाली होती. आज दर खाली आले असून, असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर…(Gold Silver Rate Today)

सोने पुन्हा घसरले 

जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरांमध्ये आपटी सुरू होती. सोन्यात तब्बल २,२०० रुपयांची घसरण झाली. जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला थोडेफार वाढले होते. तर, १ फेब्रुवारी रोजी सोने १७० रुपयांनी वाढले. २ फेब्रुवारी रोजी १६० रुपयांनी दरवाढ झाली. तर, ३ फेब्रुवारी रोजी किंमती २२० रुपयांनी खाली घसरल्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २४  कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६३,५३० रुपये तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ५८,२५० रुपये असे आहेत.

Gold Silver Rate Today | बजेटपूर्वी सोने-चांदीच्या भावात मोठी अपडेट

Gold Silver Rate Today | चांदीचे दर घसरले 

गेल्या महिन्यात सोन्यातच नाहीतर चांदितही कमालीची घसरण झाली. चांदीचे दर हे तब्बल ४,४०० रुपयांनी खाली आली. जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत चांदीच्या दरांमध्ये २ हजार रुपयांची वाढ झाली. तर, या महिन्याची सुरुवातच दरवाढीने झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी चांदीचे भाव २०० रुपयांनी घसरले. तर, २ फेब्रुवारी रोजी पुन्हा तितकीच वाढही झाली. ३ फेब्रुवारी रोजी पुन्हा भाव १००० रुपयांनी खाली आले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचे दर हे ७५,५०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोने-चांदीने आठवड्याची केली दमदार सुरुवात

असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे दर 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज सोने चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. प्रति कॅरेटप्रमाणे असे आहेत सोने-चांदीचे दर…

२४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ६३,१४२ रुपये,

२३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ६२,८८९ रुपये,

२२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ५७,८३८ रुपये,

१८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ४७,३६६ रुपये,

१४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने – ३६,९३८ रुपये असे आहेत.

तर एक किलो चांदीचे दर हे ७१,८६४ रुपये असे आहेत. (Gold Silver Rate Today)

(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here