Chhagan Bhujbal | काल अहमदनगर येथे ओबीसी समाजाची ‘महाएल्गार सभा’ पार पडली. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ही छगन भुजबळ यांची पहिलीच ओबीसी सभा होती. त्यामुळे या सभेत भुजबळ काय बोलणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, या सभेत छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. आपण १७ नोव्हेंबर रोजी अंबडच्या सभेत जाण्याआधी १६ नोव्हेंबर रोजीच मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला असल्याचे त्यांनी या भरसभेत सांगितले. दरम्यान, छगन भुजबळ यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. सगळीकडूनच भुजबळ यांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. (Chhagan Bhujbal)
राजीनामा स्वीकारलाच नाही..
दरम्यान, यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांच्या या राजीनाम्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे की, “छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण आम्ही त्यांचा हा राजीनामा स्वीकारलेला नाही. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक बोलतील, असे यावेळी फडणवीस म्हणाले.
Vinod Kumavat | ‘झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा
Chhagan Bhujbal | भुजबळांना घरचा आहेर
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही आता छगन भुजबळ यांच्या या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ते म्हणाले की “छगन भुजबळ साहेबांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला की नाही ते मला काही माहीत नाही. पण त्या राजीनाम्याची प्रत सुद्धा बाहेर आली नाही, या शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना घरचा आहेर दिला आहे. (Chhagan Bhujbal)
विदूषक बाहेर निघाला
यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हा दुसरा विदुषक बाहेर निघाला आहे. भुजबळ म्हणजे ओबीसी बांधव आणि सरकारला सुद्धा कलंक आहे”, असं सांगतानाच “आता आमची विजयी सभा मोजायला ये”, अशा खोचक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना आव्हानच केलं आहे.
तटकरेंची सावध प्रतिक्रिया
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे म्हणाले की, “राजीनामा दिला आहे की नाही यावर छगन भुजबळ यांच्याशी माझे बोलणे झाले नसून, भुजबळ काल काय बोलले, त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते आम्ही जाणून घेऊ आणि मगच प्रतिक्रिया देऊ. अहमदनगरचे भाषण मी ऐकले नाही. यावर मी त्यांच्याशी जरूर बोलेल. भुजबळ हे कधीही पक्ष सोडणार नाही, अशी सावध प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे. (Chhagan Bhujbal)
Sanjay Raut | वायफळ बडबड करण्यापेक्षा..; मालेगाव कोर्टाने राऊतांना झापले
भुजबळांचा राजीनामा मागणाऱ्यांना चपराक
दरम्यान, भाजप आमदार तथा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही आता भुजबळांच्या राजीनाम्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “छगन भुजबळ यांनी १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या ओबीसी मेळाव्याच्या आधीच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, भुजबळ यांचा राजीनामा मागणाऱ्यांना ही एक चपराक असल्याचं गोपीचंद पडळकर म्हटले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम