Vinod Kumavat | ‘झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा

0
45
Vinod Kumavat
Vinod Kumavat

Vinod Kumavat |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात अहिराणी गाण्यांची क्रेझ वाढली आहे. अनेक अहिराणी गायक आणि त्यांची गाणी ही सोशल मिडियावर व्हायरल होत असून, या गाण्यांनी अक्षरशः तरुणाईला वेड लावले आहे. लग्न असो किंवा पार्टी ही गाणी वाजल्याशिवाय ते अपूर्णच. अशाच एका गाण्याने काही दिवसांपूर्वी संबंध राज्यभरात क्रेझ निर्माण केली होती आणि खरतर याच गाण्यानंतर अहिराणी गाण्यांची प्रसिद्धी वाढली आणि ते गाणं म्हणजे ‘झुमका वाली पोर’. हे गाणं सोशल मीडियात प्रचंड ट्रेडिंग असून, आतापर्यंत या गाण्याचे यू-ट्युब प्लॅटफॉर्मवर २२५ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. या गाण्यात विनोद कुमावत आणि राणी कुमावत या जोडप्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

दरम्यान, याच गाण्याचा निर्माता आणि अभिनेता तसेच प्रसिद्ध युट्यूबर विनोद कुमावत याच्या विरोधात नाशिक शहरातील नाशिकरोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यात संबंधित महिलेने एका कथित गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान ओळख वाढवून तसेच लग्नाचे आमिष दाखवून विनोद याने आपल्यावर शारीरिक तसेच मानसिक अत्याचार केले असल्याचे आरोप केले आहेत. (Vinod Kumavat)

Sanjay Raut | वायफळ बडबड करण्यापेक्षा..; मालेगाव कोर्टाने राऊतांना झापले

Vinod Kumavat | ५ महिन्यांपासून अत्याचार 

संबंधित पाडित महिलेने नाशिक रोड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “३० ऑगस्ट २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या ५ महिन्यांच्या कालावधीत विनोद कुमावत याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवत विविध ठिकाणी नेत अत्याचार केले. तसेच मारहाण देखील केली. विनोद कुमावत उर्फ सचिन कुमावत हा नाशिक शहरातील सातपूर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे वास्तव्यास आहे. तो एक प्रसिद्ध युट्यूबर आहे आणि त्याचे ‘विनोद कुमावत’ नावाचे चॅनल आहे. त्याची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. त्याचे युट्यूबवर मिलियन्स मध्ये सब्सक्राईबर्स असून, तरुणाईमध्ये त्याची क्रेझ आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. (Vinod Kumavat)

Arvind Kejriwal | अन् भाजपने ‘आप’च्या अडचणी वाढवल्या..?

या पीडित महिलेसोबत त्याची एका गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले होते. त्यानंतर त्याने लग्नाचे अमिष दाखवत त्याने संबंधित महिलेवर अत्याचार केले. मात्र, तिने त्याला त्याच्या पहिल्या लग्नाबबत विचारले असता. त्याने लग्नाला नकार दिला व मारहाण केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. नशिक पोलिसांकडून अद्यापही विनोद कुमावत याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून, नाशिकरोड पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. (Vinod Kumavat)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here