Gold Silver Price 29 May 2024 | सोने चांदीत दरवाढ कायम; असे आहेत आजचे दर

0
49
Gold Silver Price 29 May 2024
Gold Silver Price 29 May 2024

Gold Silver Price 29 May 2024 |  गेल्या दोन महिन्यांपासून सुसाट असलेल्या सोने चांदीच्या दरवाढीच्या गाडीला गेल्या आठवड्यात ब्रेक लागला. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मागील आठवड्यात सोने २,७०० रुपयांनी स्वस्त झाले. तर, जवळपास लाखाच्या घरात पोहोचलेल्या चांदीनेही नरमाई घेतली आणि गेल्या आठवड्यात चांदीतही ६००० रुपयांची घसरण झाली.

मात्र, या आठवड्यात सोने चांदीने पुन्हा दरवाढीकडे कूच केली असून, दोन दिवसांत पुन्हा सोने चांदीने मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षीही दर तेजीत होते. मात्र, यंदा तर सोने चांदीने मागील वर्षीचेही सर्व रेकॉर्ड मोडले आहे. या दरवाढीचा गुंतवणूकदारांना मात्र मोठा फायदा झाला. आज असे आहेत सोने चांदीचे भाव…(Gold Silver Price 29 May 2024)

सोन्यात दरवाढ

गेल्या आठवड्यात सोन्याने ७५ हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, त्यानंतर त्यात तब्बल २,७०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, या आठवड्याची सुरुवात सोने चांदीने दरवाढीने केली असून, आता सोन्याच्या किंमतीत ५०० रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या भावात २७० रुपयांची तर, मंगळवारी २२० रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ७३,०८० रुपये तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ६७,००० रुपये असे आहेत. (Gold Silver Price 29 May 2024)

Gold Silver Price 28 May 2024 | ग्राहकांना दिलासा नाहीच..!; सोने चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ

Gold Silver Price 29 May 2024 | चांदीची मोठी भरारी 

जवळपास लाखाच्या घरात पोहोचलेल्या चांदीच्या दरवाढीला गेल्या आठवड्यात ब्रेक लागला आणि मागील आठवड्यात चांदीच्या किंमतीत ६ हजाराची घसरण झाली. या आठवड्यात पुन्हा दरवाढ सुरू झाली असून, चांदी ५,००० रुपयांनी महागली आहे. सोमवारी चांदीत १,५०० रुपयांची वाढ झाली. तर मंगळवारी ३,५०० रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा ९६,५०० रुपये आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,२९१ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,००२ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,२१९ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,२१८ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,२९० रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ९३,१२० रुपये असा आहे. (Gold Silver Price 29 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)

Gold Silver Price 24 May 2024 | ग्राहकांसाठी आनंदवार्ता; सोने चांदीत मोठी घसरण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here